शिवसेना डॉ सेलचे जिल्हाप्रमुख व होमिओपॅथीक विंगचे जिल्हा प्रमुखपदी डॉ संजय थोरात यांची निवड.
दैनिक आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर /प्रतिनिधी /फिरोज मन्सुरी गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन सावंगी येथील डॉ संजय साहेबराव थोरात यांची हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व धर्मवीर आनंद दिघे यांच्या कर्तुत्वाला स्मरुन व शिवसेना पक्ष प्रमुख तथा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मा. एकनाथ शिंदे .खा. डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच डॉ. धनंजय गोविंदराव पडवळ प्रदेशप्रमुख शिवसेना डॉक्टर सेल यांच्या नेतृत्वाखाली आपली छत्रपती संभाजीनगर शिवसेना डॉक्टर सेल जिल्हा उप-प्रमुख तथा होमिओपॅथिक विंग जिल्हा प्रमुखपदी डॉ संजय थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती हिंदू हृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार व धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण व महाराष्ट्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खा ,श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या जनहित कार्याचा प्रचार व प्रसार कराल आणि पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी तसेच पक्षवाढीवसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल म्हणून पक्षांनी आपल्यावर विश्वास. टाकलेला आहे. सर्व सामान्यांच्या समस्या प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आसल म्हणून पक्षाने आपल्यावर जबाबदारी टाकलेली आहे.. डॉ संजय थोरात यांची सदरील निवडीबद्दल खा, संदिपान भुमरे आ, विलास बापू भुमरे शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना जिल्हाप्रमुख कडूबा महाराज गव्हादे राजेंद्र जंजाळ भरत सिंग राजपूत दिलीप निरपळ बाळासाहेब चव्हाण किशोर पाटील चव्हाण बादशहा पटेल नितीन कराळे संदीप आढावसह आदींनी अभिनंदन केले पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या