शिवसेना दलित आघाडी कार्यकर्ता मेळावा – मोठ्या संख्येने उपस्थित रहा – शिवसेना दलित आघाडी जिल्हाप्रमुख अॅड. मगरे
प्रति,
मा. संपादक/जिल्हाप्रतिनिधी,
आपल्या लोकप्रिय दैनिकांतून बातमी प्रसिध्दीस द्यावी ही विनंती.
घनसावंगी येथे आज १६ जुन रोजी शिवसेना दलित आघाडी
कार्यकर्ता मेळावा – मोठ्या संख्येने उपस्थित रहा
– शिवसेना दलित आघाडी जिल्हाप्रमुख अॅड. मगरे यांचे आवाहन
घनसावंगी, दि. १५(प्रतिनिधी)- सोमवार १६ जून रोजी घनसावंगी येथील शासकीय
विश्रामगृहात तालुका स्तरीय शिवसेना दलित आघाडी कार्यकर्ता मेळाव्याचे
आयोजन करण्यात आले असून जास्तीत-जास्त कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे,
असे आवाहन शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख भास्कर मगरे यांनी
प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातून केले आहे.
सदरील मेळाव्याचे उद्घाटन शिवसेनेचे आमदार डॉ. हिकमत उढाण करणार असून
मेळाव्याचे अध्यक्षस्थानी शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख अॅड.
भास्कर मगरे राहणार असून माजीमंत्री तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या
आदेशाने जिल्हा संपर्कप्रमुख पंडीत भुतेकर, ए.जे.बोराडे, भाऊसाहेब घुगे,
घनसावंगी तालुकाप्रमुख बापूसाहेब देशमुख, उध्दव मरकड, आण्णासाहेब बाळराज
यांची उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती अॅड. भास्कर मगरे यांच्यामार्फत
संयोजक शिवसेना दलित आघाडी तालुकाप्रमुख जयकुमार खरात यांनी दिली आहे.
