Sunday, March 29, 2026
Homeऔरंगाबादशिव जयंतीनिमित्त शिव गितांचा व व्याख्यानाचा कार्यक्रम कुणाकडूनही दमडी न घेता पंकजभाऊ...

शिव जयंतीनिमित्त शिव गितांचा व व्याख्यानाचा कार्यक्रम कुणाकडूनही दमडी न घेता पंकजभाऊ बागल यांचा अभिनव उपक्रम

शिव जयंतीनिमित्त शिव गितांचा व व्याख्यानाचा कार्यक्रम
कुणाकडूनही दमडी न घेता पंकजभाऊ बागल यांचा अभिनव उपक्रम

 

जालना/प्रतिनिधी/ आज काल अशी फॅशन आली आहे की, एखाद्या महापुुुरुषाची जयंती आली की, नको- नको ते चेहरे आपल्या समोर येऊन उभे राहतात. मात्र पंकज बागल यांनी स्वत: संपूर्ण खर्च करुन यंदा शिव जयंतीनिमित्त शिव गितांचा आणि व्याख्यानाचा कार्यक्रम घेऊन एक अभिनव असा उपक्रम पंकजभाऊ बागल यांनी राबविला आहे.ना राजकारणी मंडळींकडून देणगीच्या नावाखाली पैसे घेतले ना व्यापार्री, उद्योजकाकडून  वसूल केले, तरीही त्यांनी शिवजयंती हा उत्सव उत्साहात पार पाडला. याकामी त्यांना मित्र मंडळीचे बरेच मोठे सहकार्य लाभले.
शिव जयंतीनिमित्त पंकजभाऊ बागल यांनी प्रारंभी महाराष्ट्रातील ख्यातनाम शिव व्याख्याते रामजी गाडे यांचा कार्यक्रम तर नंतर शिव गीतकार रविंद्र कोकणे यांच्या शिव गितांचा कार्यक्रम पार पडला. अंबड चौफुली परिसरात झालेल्या या कार्यक्रमास जालना महानगर पालिकेच्या प्रथम महापौर वंदना मगरे आणि उपमहापौर राजेश राऊत यांच्यासह पंकजभाऊ बागल यांच्या प्रमुख उपस्थित हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी पंकजभाऊ बागल यांच्यासह उत्सव समितीचे अध्यक्ष योगेश कदम, उपाध्यक्ष  सातफुले आणि राज कबाळे, बालाजी गाडे व रविंद्र खोमणे यांनी परिश्रम घेतले, या कार्यक्रमासाठी शहर आणि परिसरातील नागरीकांची मोठी उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या प्रारंभी महापौर वदना मगरे आणि उपमहापौर राजेश राऊत तसेच शिव जयंती समितीचे पंकजभाळ बागल यांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केल्यानंतर या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन अनिल कोल्हे केले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments