Sunday, October 26, 2025
Homeनाशिकअहमदनगरशिधापत्रिका ई-केवायसी करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

शिधापत्रिका ई-केवायसी करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

शिधापत्रिका ई-केवायसी करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

जालना: राज्यात रेशनकार्ड धारकांना घरबसल्या ई-केवायसी करण्यसासाठी केंद्र सरकारने मेरा ई-केवायसी अॅप सुरु केले आहे. इतकेच नाही तर जिल्ह्यातील रास्त भाव दुकानदारही शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसीसाठी मागे लागून करुन घेत आहेत. तरीही राशन कार्डधारकाकडून उत्साहाने ई-केवासीचे काम होत नसल्याची खंत जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी व्यक्त केली. दरम्यान आता शासन स्तरावरुन 30 एप्रिल पर्यंत शिधापत्रिकाधारकांना ई-केवासी करण्यासाठी मुदतवाढ दिली असून, आता ही शेवटचीच संधी असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

आतापर्यंत 29 टक्के लाथार्थ्यांनी ई-केवासी केली नाही. नागरीकांनी एप्रिल शेवटपर्यंत ई-केवासीकडे पाठ फिरवल्यास 30 एप्रिल नंतर त्यांचा धान्य पुरवठा बंद केला जाईल, असा गंभीर आणि शेवटचा इशार जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिला. राशन कार्डसाठी ई-केवासी शासनाने मागील 6-7 महिन्यांपासुन सुरु केली आहे. मध्यंतरी तांत्रिक अडचणी मुळे या माहीमेला गती येत नव्हती. यामुळे शासनाच्या वतीने मुदतवाढ देण्यात आली. मागील मुदतीनंतर 28 फेब्रुवारी, 31 मार्च आणि आता एप्रिल 30 पर्यंत म्हणजे 3 महिने मुदतवाढ देण्यात आलेली आहे.

तरी सर्व लाभार्थी यांनी ई-केवासी करुन घ्यावी, अनेक कार्डधारकांचे अंगठे ई-पॉश मशीनवर स्कॅन होत नव्हते, यामुळे आता या राशन कार्डधारकांचे ई-पॉश मशीनवर डोळे स्कॅन करुन ई-केवासी प्रक्रीया पुर्ण करता येत आहे. यामुळे ज्या त्या भागातील नागरीकांनी आपल्या जवळच्या राशन दुकानात जाऊन तात्काळ ई-केवासी करुन घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून प्रसिध्दीपत्रकाद्वारे करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments