Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादआनंदी जीवनासाठी ब्रह्माकुमारीजतर्फे जालन्यात 3 दिवशीय निशुल्क शिबिर

आनंदी जीवनासाठी ब्रह्माकुमारीजतर्फे जालन्यात 3 दिवशीय निशुल्क शिबिर

आनंदी जीवनासाठी ब्रह्माकुमारीजतर्फे
जालन्यात 3 दिवशीय निशुल्क शिबिर
जालना/प्रतिनिधी/ ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्यावतीने जालन्यात 14 ते 16 जूनदरम्यान “आनंदी जीवन कसे जगावे”  या विषयावर तीन दिवसीय निशुल्क शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, त्यात सुप्रसिद्ध प्रेरणादायी वक्ते व प्रशिक्षक प्रो. ई. व्ही. गिरीश (मुंबई) यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
           मंठा चौफुलीवरील प्रियंका रेसिडेन्सीमधील ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या राजयोग भवनात दररोज सायंकाळी 7 ते 8 या होणाऱ्या या शिबिराचा शुभारंभ 14 जून रोजी सायंकाळी 6.30 वाजता महाराष्ट राज्य अंदाज समितीचे अध्यक्ष आ. अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून पोलाद स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक कश्मिरीलाल अग्रवाल आणि दैनिक आनंदनगरीचे संपादक शिवरतन मुंदडा यांची उपस्थिती राहणार आहे.
      शिबिराच्या पहिल्या दिवशी प्रो. ई. व्ही. गिरीश हे  ‘तणाव जीवनातील सर्वात मोठी अडचण’ या विषयावर मार्गदर्शन करणार असून, दुसऱ्या दिवशी ‘स्वतःमधील हिरोला ओळखण्याचा मंत्र’ देणार आहेत तर तिसऱ्या दिवशी ‘राजयोग मेडिटेशनच्या आधारे आत्मिक परिवर्तन’ साधण्याच्या उपायांवर चर्चा होईल. तसेच याच विषयावर हे एक दिवशीय शिबिर 15 जून रोजी परतुर येथे सकाळी 9 ते 11 तर 16 जून रोजी अंबड येथे सकाळी 9 ते 11 या वेळेत होणार आहे.
          प्रो. ई. व्ही. गिरीश हे मागील 18 वर्षांपासून ब्रह्माकुमारी संस्थेशी जोडले गेलेले असून, देशभरातील विविध नामांकित संस्था, शासकीय व खासगी कार्यालये, शिक्षण संस्था तसेच सुरक्षादल यामध्ये मनःशांती, आत्मबळ आणि नेतृत्व विकासावर हजारो लोकांना प्रभावी मार्गदर्शन त्यांनी केले आहे. सायको-नेरोबिक्स (अप्लाइड सायकोलॉजी) या विषयात त्यांनी पदविका घेतलेली असून, मार्केटिंग व फायनान्समध्ये त्यांनी एमबीए केले आहे. त्यांच्या सहज, प्रभावी आणि अनुभवसंपन्न शैलीमुळे श्रोत्यांवर खोल परिणाम होतो.
    जीवनात बदल घडवून आणण्यासह स्वतःला नव्याने ओळखण्यासाठी आणि एक सकारात्मक जीवनशैली स्वीकारण्यासाठी ही एक अनमोल संधी असून, जालन्यातील नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि अधिक माहितीसाठी लक्ष्मीनारायण मानधना 9422724328, कल्पना लाहोटी 8830936080, डॉ. सतीश मोरे 9422216703, भारती मोरे 7769046004, सुनील लाहोटी 9423662888,  वीणा साबू  9422216717 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments