शेखर भाऊ मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमाननगर शाळेमध्ये पर्यावरणपूरक रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरे
बीड/प्रतिनिधी/ महाएनजीओ फेडरेशन, महाराष्ट्र राज्य आयोजित गोमय रक्षाबंधन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमाननगर ता केज जि बीड येथे श्री तुळजाभवानी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, जोला ता केज जि बीड यांनी महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष आदरणीय शेखर भाऊ मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २६/०८/ २०२५ रोजी सकाळी मोठ्या उत्साहात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमाननगर येथे पर्यावरणपूरक रक्षाबंधनाचा कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अर्चना महाद्वार माथेसुळ मॅडम, सौ आशाताई ढाकणे यांच्यासह आनेराव सर यांचीही उपस्थिती होती.
या कार्यक्रमांमध्ये गोमातेच्या सेना पासून निसर्ग पूरक बनवलेल्या राख्या महाएनजिओ फेडरेशन महाराष्ट्र राज्य चे जेष्ठ संचालक मुकुंद आण्णा शिंदे यांनी पाठवलेल्या राख्या वापरण्यात आल्या या राख्यामुळे निसर्गामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही.महा एनजीओ फेडरेशन ची संकल्पना लक्षात घेऊन रक्षाबंधन निमित्त राखी बांधण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमांमध्ये शाळेतील मुलींनी व संस्थेच्या महिला सदस्यांनी विद्यार्थ्यांना तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षक यांना राख्या बांधल्या व बहिण भावाच्या या पवित्र नात्याचा आनंद द्विगुणित केला सदर कार्यक्रमांमध्ये गावातील अंगणवाडी कार्यकर्ती सुनिता केदार , सविता सारुक , महिला प्रतिष्ठित नागरिक, संस्थेचे पदाधिकारी रुक्मिणीबाई ढाकणे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अर्चना महाद्वार माथेसुळ व शिक्षक वृंद उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या सचिव सौ आशाताई ढाकणे यांनी परिश्रम घेतले.शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रम संपला असे जाहीर केले.