देवगिरी महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती उत्सव साजरा
छत्रपती संभाजीनगर/ प्रतिनिधी/राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस 26 जून सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. आरक्षण देणारा पहिला राजा, क्रीडा, शिक्षण यांना राजाश्रय देणारा राजा, सर्व क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारा असा हा लोक कल्याणकारी राजा, समाजसुधारक छत्रपती शाहू महाराज यांच्या 151 व्या जयंती उत्सवाचे देवगिरी महाविद्यालयात आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ अशोक तेजनकर यांनी शाहू महाराज यांच्या शैक्षणिक कार्यासंबंधी, तसेच विदयार्थ्यांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण उपलब्ध करून दिले, शिष्यवृत्ती योजना आणि वसतिगृह या मूलभूत शैक्षणिक सोयीसुविधा व बहुजनांच्या शिक्षणाची सोय केली यासंबंधाने विचार मांडले.
या जयंती प्रसंगी उपप्राचार्य डॉ रवी पाटील, डॉ अपर्णा तावरे, डॉ गणेश मोहिते, प्रा सुरेश लिपाने, प्रा.अरुण काटे, प्रा. नलावडे, कुलसचिव डॉ.दर्शना गांधी, डॉ बाळासाहेब निर्मळ आणि विद्यार्थी, प्राध्यापक, आणि प्रशासकीय कर्मचारी आदी ची उपस्थिती होती.
