Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादशेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन

शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन

शेतकऱ्यांना कृषी विभागाचे आवाहन

           जालना :- जिल्ह्यात पुर्नरचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना फ्युचर जनरल इंडिया इन्शुरन्स कं.लि.मार्फत राबविण्यात येत आहे. पुर्नरचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. ज्या शेतकऱ्यांनी फळपिकांचा विमा घेतलेला आहे. परंतू फळपिकांची ई-पीक पाहणी डिजीटल क्रॉप सर्वे मोबाईल ॲपद्वारे केलेली नाही त्यांनी 25 एप्रिलपर्यंत ई-पीक पाहणी पुर्ण करावी.सातबारा उताऱ्यावर नोंद नसलेले विमा अर्ज रद्द करण्यात येतील व फळपिक विम्याचा लाभ दिला जाणार नाही. सविस्तर माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments