विना विलंब विना शर्त शेतकऱ्यांना पिक कर्ज द्या,नसता तीव्र आंदोलन – शिवसेना उबाठा
शिवसेना( उबाठा) शिवसैनिक कार्यकर्ते कडून बॅंक व्यवस्थापकाला निवेदन
खुलताबाद/प्रतिनिधी/ खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी येथे शिवसेना (उबाठा) गट पक्षा कडुन शेतकऱ्यांना विना विलंब विना शर्त तातडीने पिक कर्ज देण्या संदर्भात बॅंक आफ महाराष्ट्र,बॅंक व्यवस्थापकाला निवेदन देवून अवगत करण्यात आले.नसता तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांची दिवसांदिवस शेती ला घेवून दयनीय तथा दुरावस्था होत असुण नैसर्गिक आपत्ती,नापिकी,घटते उत्पन्न, घटते शेती माल भाव,वाढते खरेदी साहित्य भाव,शासनाचे विम्याला घेवून दुर्लक्ष सोडधर पणा त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
अशात बॅंकेकडून पिक कर्जाला घेवून चालढकल थकबाकी सिबील व इतर तांत्रिक अडचणी दाखवत शेतकऱ्यांना पिक कर्जापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न होत आहे.यामुळे शेतकरी सतत आर्थिक अडचणीत सापडत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना पिक कर्ज घेणे गरजेचे आहे व ते कर्ज बॅंकेने विना विलंब विना शर्त तातडीने द्यावे नसता शिवसेना (उबाठा) गट पक्ष तीव्र आंदोलन छेडले यांची नोंद घ्यावी असे अवगत करण्यात आले आहे.
यावेळी सरपंच आप्पाराव पाटील नलावडे,माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन सिंग राजपूत,बाळु पाटील खुटे, कृष्णा घुले, संभाजी नलावडे,दहातोंडे सह सावंगी झरी ताजनापूर धामणगाव दरेगाव येथील शेतकरी पक्ष कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.
