शांतता टिकवून ठेवण्याची जबाबदारी प्रशासना बरोबर समाजाची देखील आहे – सपोनी सुरवसे
आष्टी/ प्रतिनिधी /अंगद मुंढे /मुस्लिम धर्मियांचा रमजान ईद व यानंतर गुढीपाडवा उत्सव साजरे होणार आहेत. हे उत्सव हर्ष आनंदात उत्साहाने साजरे करा मात्र या काळात कुठलीच अनुचित घटना आपल्या हातून घडणार नाही व कुठेच गालबोट लागून कायदा आणि सुव्यवस्थेला अतिरिक्त ताण प्रशासनावर पडणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी, तसेच उत्सव काळात आपल्या गावात, आपल्या परिसरात शांतता टिकवून ठेवण्याची जबाबदारी प्रशासना बरोबर समाजाची देखील आहे. समाजाचा जबाबदार घटक या नात्याने प्रत्येकाने स्वतःहून ही जबाबदारी स्वीकारणे गरजेचे असल्याचे मत पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांनी व्यक्त केले आहे.
आगामी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर आष्टी पोलीस स्टेशनमध्ये सोमवारी शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शांतता कमिटी सदस्यांशी संवाद साधतांना सुरवसे बोलत होते. यावेळी सपोनी सचिन इंगेवाड, उपनिरीक्षक अजित चाटे,सरपंच मधुकर मोरे, विक्रम राजे तौर, बाबाराव थोरात,रोहन वाघमारे आदींची उपस्थिती होती. आपले सण, उत्सव साजरे करतांना इतरांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी प्रत्येकाने जाणीपूर्वक घेतली पाहिजे, विशेषतः समाज माध्यमांवर व्यक्त होतांना आपल्या पोस्टमुळे काही वादंग निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. उत्सव काळात समाजमाध्यमांवर पोलिसाची विशेष निगराणी असणार आहे. कुणी समाजकटंक गैर कृत्य करताना निर्दशनास आला तर अशा व्यक्तीवर कड़क कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी माहिती सपोनी गणेश सुरवसे यांनी दिली.सुत्रसंचलन अंबादास पौड तर आभारप्रदर्शन अजित चाटे यांनी केले.यावेळी आष्टी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रमुख व्यक्ती तसेच गावातील नागरिकांची उपस्थिती होती.
दरम्यान सपोनी सचिन इंगेवाड यांना निरोप देण्यात आला यावेळी इंगेवाड यांनी लाच प्रकरणावर आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की माझ्यावर जे काही आरोप करण्यात आले आहे ते खोटे होते. जर मी आरोपी असतो तर मला कोर्टाकडून जामीन मिळाला नसता. आरोपाच्या संदर्भात म्हणाले की मा तहसीलदार डॉ प्रतिभाताई गोरे यांनी फिर्यादीचा अवैध वाळू वाहतूक करताना पकडून आमच्या कर्मचाऱ्यांकडे सुपुर्द केला होता.मात्र नंतर फियादीने तो पकडण्यात आलेल्या अवैध वाळूने भरलेला हायवा कर्मचाऱ्यास दमदाटी करून पडून गेला असता त्यांच्यावर आष्टी पोलिस ठाण्यात कर्मचाऱ्यांच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता.फिर्यादीने यामुळे रागात भरात माझ्यावर षडयंत्र रचत लाच मागितली म्हणून खोटा आरोप केल्याचे सांगितले.