Saturday, October 25, 2025
Homeअमरावतीअकोलासायबर युनिट प्रत्येक पोलीस ठाण्यात स्थापन करण्यात यावे; - अ‍ॅड. शंकर चव्हाण...

सायबर युनिट प्रत्येक पोलीस ठाण्यात स्थापन करण्यात यावे; – अ‍ॅड. शंकर चव्हाण यांची गृहमंत्र्यांकडे मागणी

सायबर युनिट प्रत्येक पोलीस ठाण्यात स्थापन करण्यात यावे; – अ‍ॅड. शंकर चव्हाण यांची गृहमंत्र्यांकडे मागणी

मुंबई/प्रतिनिधी/ सायबर गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ होत असताना सर्वसामान्य नागरिकांसाठी तातडीची आणि प्रभावी मदत मिळवण्यासाठीची यंत्रणा अजूनही अपुरी आहे. अनेक गुन्हे केवळ तांत्रिक तपासाची सोय नसल्यामुळे उघडकीस येत नाहीत आणि आरोपी मोकाट फिरतात. विशेषतः ग्रामीण भागातील पोलीस ठाण्यांमध्ये ना पुरेसं प्रशिक्षण आहे, ना आवश्यक तांत्रिक साधनसामग्री – ज्यामुळे तिथे सायबर गुन्ह्यांचा तपास अजूनच आव्हानात्मक ठरतो.

महाराष्ट्रात सायबर गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. बँकिंग फ्रॉड, ऑनलाईन स्कॅम्स, सोशल मीडियाद्वारे होणारी फसवणूक आणि महिलांना लक्ष्य करणारे गुन्हे हे आता केवळ शहरी भागापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. हे गुन्हे ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात घडत आहेत. म्हणूनच, प्रत्येक पोलीस ठाण्यांत स्वतंत्र सायबर गुन्हे शाखा युनिट स्थापन करण्यात यावीत, अशी जोरदार मागणी अ‍ॅड. शंकर चव्हाण, ॲडव्होकेट, बॉम्बे हायकोर्ट यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वरून एक ट्वीट करत महाराष्ट्राचे गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना थेट आवाहन केले आहे. 

पुडुचेरीत वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर All India Anna Dravida Munnetra Kazhagam (AIADMK) ने सुद्धा अशीच मागणी केली असून, पक्षाचे सचिव अ. अण्णाबलन यांनी नुकत्याच पत्रकार परिषदेत हे ठळकपणे मांडले आहे.ते म्हणाले, “पुडुचेरीत सायबर गुन्हे वाढले आहेत. कोट्यवधी रुपयांची फसवणूक होत असून अनेक सरकारी कर्मचारी यात बळी पडले आहेत. त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यासाठी पैसे कुठून आले, याचीही चौकशी झाली पाहिजे. त्यामुळे प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर युनिट असणं अत्यावश्यक आहे.”याच अनुषंगाने अ‍ॅड. शंकर चव्हाण यांनी महाराष्ट्रातही असेच युनिट्स स्थापन करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, “महाराष्ट्रात तरुण वर्ग, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, नोकरदार, महिला – सर्वजण सायबर फसवणुकीचे बळी पडत आहेत. ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर यांसारख्या शहरांतच नव्हे, तर बीड, उस्मानाबाद, लातूरसारख्या ग्रामीण जिल्ह्यांतही हे गुन्हे वेगाने वाढत आहेत.”त्यांनी स्पष्ट केले की, “पोलीस विभागात अत्याधुनिक सायबर फॉरेन्सिक प्रशिक्षण असलेले अधिकारी असतील, तर हे गुन्हे लवकर उघडकीस आणता येतील. यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात सुसज्ज सायबर युनिट असणं अत्यंत गरजेचं आहे.”त्यांनी हे देखील म्हटले की, “फसवणूक झाल्यानंतर अनेक जण लाजेपोटी पोलिसांकडे तक्रार करत नाहीत. त्यामुळे अशा युनिट्समुळे जनतेचा विश्वास परत मिळेल आणि फसवणूक रोखता येईल.”त्यांनी राज्य सरकारकडे तातडीने खालील बाबींसाठी मागणी केली आहे:प्रत्येक पोलीस ठाण्यात सायबर युनिट सुरू करावं.प्रशिक्षित अधिकारी, सॉफ्टवेअर, इंटरनेट ट्रॅकिंग सिस्टम उपलब्ध करून द्याव्यात.सायबर फसवणुकीबाबत जनजागृती मोहीम राबवावी.तक्रारदारांना त्वरित मदत देण्यासाठी २४x७ हेल्पलाईन सुरु करावी.अखेर, अ‍ॅड. शंकर चव्हाण यांनी सूचित केलं की, “सायबर सुरक्षेच्या युगात सायबर युनिट ही एक मूलभूत गरज आहे, सोय नाही!” अशी ठाम भूमिका सरकारने घ्यावी.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments