Sunday, March 29, 2026
Homeऔरंगाबादशाळेत पटसंख्या वाढवायची असेल तर

शाळेत पटसंख्या वाढवायची असेल तर

शाळेत पटसंख्या वाढवायची असेल तर
          आज मराठी शाळा ओस पडत आहेत व इंग्रजी शाळा वाढत चाललेल्या आहेत. याचं कारण काय असावं? यातील कारणांचा शोध घेतांना लोकं पालकांना दोष देतात. म्हणतात की पालकांचा कल इंग्रजी माध्यमाकडे जास्त आहे. त्यांना मराठी शाळा अजिबात आवडत नाहीत. त्यातच लोकं तशी प्रतिक्रिया देवून मोकळे होतात. परंतु यात पालकांचा दोष नाहीच. दोष आहे शिक्षकांच्या शिकविण्याचा. त्यातच त्यांच्या भांडणाचा. मराठी शाळेतील जिल्हापरीषद शाळेतील शिक्षक मंडळी ही बहुतांश भागात बहुतांश प्रमाणात आपल्या शाळेतच राहात नाहीत. बऱ्याच शाळेत ते आठवड्यातून फक्त दोन दिवस शाळेत दिसतात. हीच वास्तविकता आहे आजची. त्यातच काही शाळेत शिक्षक दिसतात तर ते पुर्ण वेळ अगदी चांगल्या पद्धतीनं आज शिकवितांना दिसत नाहीत. असं बऱ्याच ठिकाणी घडतं. मग चर्चा होते व ती चर्चा एवढ्या दूर पसरते की लोकं आपली मुलं जिल्हापरीषद शाळेत टाकायला तयार होत नाहीत. ते पैसे लागले तरी चालतात. असा विचार करुन कॉन्व्हेंटच्या शाळेत पुर्ण वेळ वर्गातच बसून राहणाऱ्या शिक्षकांच्या सानिध्यात टाकतात. त्यातच आज जरी अशा कॉन्व्हेंटच्या शाळेत मुलांना शिकवीत नसले तरी ती पालकांना गरज वाटते.  ज्याप्रमाणे जिल्हापरीषदच्या ग्रामीण भागात शिक्षकांचं शिकविणं पालकांना निराश करतं. त्याचप्रमाणे शहरी भागात जिल्हापरीषद अंतर्गत चालणाऱ्या खाजगी शाळाही असतात.त्या शाळेत गटबाजी चालते. ज्या गटबाजीत संस्थाचालक एक ट्रष्टी असून तो स्वतःला मालकच समजतो. त्यानंतर तो शिक्षकांकडून त्यांना मिळणाऱ्या वेतनातून पैसा कमवतो. ज्यातून असा पैसे देणारा शिक्षक शाळेत शिकवीत नाही. त्यातच काही असा पैसा न देणारेही बरेच शिक्षक असतात. ज्यांचा वाद सुरु हैतो संस्थाचालकाशी. मग असा वाद सुरु झाला की आरोप प्रत्यारोप होतात शिक्षकांवर. त्यातच चांगले शिकविण्याचे काम जरी शिक्षक करीत असला तरी त्याची मानसिकता खराब होते. ज्यातून त्याच्या हातून चांगलं शिक्षण मुलांत उतरत नाही. त्यानंतर हेच वाद वा शिक्षकांचं न शिकविणं पालकांना माहीत होतं व शाळा तुटते. जर शाळा वाढवायची असेल तर अशा प्रकारचा वाद होवूच नये. कोणतेही वाद हे सामोपचाराने सोडवावेत. विद्यार्थ्यांना चांगलं शिकवावं. ती गरज आहे. ज्यातून शाळा वाढू शकते व विद्यार्थीही वाढू शकतात.*
           ड्युटी ही अतिशय महत्त्वपूर्ण गोष्ट. तिथे आपण आपल्या जीवनातील बराच काळ काढत असतो. नव्हे तर काढावाच लागतो. जर आपण तसा वेळ काढत नाही, असं म्हटल्यास आतिशयोक्ती होईल. कारण ड्युटीमुळं आपल्या घरादाराची शोभा वाढते. कारण ड्युटी आपलंच पोट नाही तर आपल्या कुटुंबाचं पोट भागवते. आपल्या गरजाही पुर्ण करते.
          शाळा……. शाळाही आपलं कुटुंब आहे. शाळेत आपण आपल्या जीवनातील बराच काळ काढतो. शाळा आपलं जीवन घडवते. शाळा जर नसेल तर शिक्षकांचे पोट भागत नाही आणि शाळा जर नसेल तर मुलांना अभ्यास शिकता येत नाही. त्यातच शाळा जर ऑसेल तर विद्यार्थ्यांना आपले आयुष्य घडवता येत नाही.
           शाळा हे ज्ञान देण्याचे केंद्र आहे. अशा शाळेत आपण ज्ञान घेत असतो आणि ज्ञान देतही असतो. त्यामूळं तो आपला परीवार बनतो. संयुक्त परिवार. त्यातच अशा परिवारात माणूसकीचं आणि आपुलकीचं नातं निर्माण होतं. परंतु हे जरी खरं असलं तरी आज त्या परिवारातील संबंध बिघडले आहेत नव्हे तर बिघडवले गेले आहेत. हे संबंध अलिकडील काळात खाजगीकरणानं बिघडवले आहेत. शाळा या अलिकडील काळात खाजगी बनल्या. ज्यातून मालक नावाची पद्धत आली. या पद्धतील मालक असलेला व्यक्ती हा अज्ञानी असतो व नोकर असलेला व्यक्ती हा सुशिक्षित असतो. मालक असलेला व्यक्ती हा अज्ञानी असल्यानं त्याला मुल्य, क्षमता, ध्येय या गोष्टी समजतच नाहीत. समजतं फक्त पैसा कमविणं. जो पैसा एक बाजारु स्री कमवत असते.
        अलिकडील काळात शाळेत आलेल्या मालक नोकर या पद्धतीत शिक्षक नावाचा कर्मचारी कितीही शिकला तरी त्याची इज्जत ही होत नाही. कारण त्याच्याकडे मालक एक कर्मचारी म्हणून न पाहता, फक्त एक कामगार म्हणून पाहतो. त्यातच अशा शिक्षकांना कामगार समजून तो त्याला मिळणाऱ्या वेतनातून पैशाची वसूली करतो. त्याच्याकडून श्रम जास्त घेतो आणि त्याला श्रमाचा मोबदला हा कमी देतो. असं प्रत्येक ठिकाणी घडतं. अशाच पैशाच्या व्यवहारानं शाळेत असलेलं आपुलकीचं नातं नष्ट होतं व स्वार्थ शिरतो. ज्यातून वाद, प्रतिवाद, भांडणं, एकमेकांना पिटणं सुरु होतं. आज शाळेतील कोणत्याच सदस्यांत आपुलकीची भावना दिसून येत नाही. विद्यार्थ्यांबद्दलही आपुलकीची भावना शिक्षकात दिसून येत नाही. त्यातच काही आजचे शिक्षक त्यांच्या हातात शिकणाऱ्या मुलींवर डोळे टाकत असतात व वात्रटसारखे बोलत असतात. त्यातच काही तांदळातील खड्यांसारखे असलेले शिक्षकही आपल्याच शाळेतील मुलींना भाळवतात. ज्यातून असे शिक्षक अशा मुलींना ब्लॅकमेल करुन बलात्कारासारखे पाशवी अत्याचार करतात. तरीही अशा शिक्षकांवर कारवाई शुन्य असते. कारण ते शिक्षक मालकांचे नातेवाईक असतात.
         आजच्या शाळा या कारखान्यासारख्याच बनल्या आहेत. फरक फक्त एवढाच दिसतो की कारखान्यात कच्च्या मालाचं उत्पादन पक्क्या मालात होतं तर शाळेत कच्च्या विद्यार्थ्यांचं रुपांतर एका आदर्श नागरीकात होतं. तेही अलिकडील काळात बरोबर होत नाही. त्याचं कारण आहे, शाळेत आलेले पैशाला महत्व. मालक नावाचा सधन व्यक्ती आणखी सधन बनण्यासाठी त्याच्या शाळेत असलेल्या इतर शिक्षकांना लुटतो. त्यातच काही शिक्षक आपल्या मालकाला पैसे देतात. बदल्यात ते त्याच्या हाताखालच्या विद्यार्थ्यांना बरोबर शिकवीत नाहीत. मग शिक्षण पाहा नाही तर पैसा पाहा अशी अवस्था होते शाळेची. तसेच काही शिक्षक विद्यार्थी हित पाहतात आणि ते पाहात असतांना केवळ शिक्षण पाहा नाही तर पैसा. यातूनच वाद निर्माण होतात. ते वाद एवढे शिगेला पोहोचतात की अशा शाळेत विद्यार्थ्यांना नीट शिक्षण मिळत नाही. अशावेळेस शाळा हे कुटुंब राहात नाही. ते कुटुंब नष्ट होतं. एकमेकांच्या कुरापती काढल्या जातात. शाळेला छावणीचं रुप प्राप्त होतं व एकमेकांचे हेवेदावे करीत शाळेतच रामायण, महाभारत सुरु होतं. शिकविण्याची मुल्ये बाजूला पडतात. याचा परिणाम हा होतो की हेच वाद पालकांना दिसतात व ते पालक कालांतरानं आपली मुलं शाळेत टाकत नाहीत. ते आपली मुलं शाळेतून काढून घेतात व दुसरीकडे नेवून टाकतात. ज्या शाळेत वाद होत नाहीत.
          विशेष म्हणजे शाळा हे आपले कुटुंब असून त्या ठिकाणी कोणत्याच गोष्टीवरुन वाद होवू नयेत. पैशावरुन तर अजिबात वाद होवू नयेत. त्यातून केवळ पैसा कमविण्याचा उद्देश नसावा. समजा वाद झालेच तर ते वाद सामोपचाराच्या माध्यमातून सोडवले जावेत. कर्मचाऱ्यांनाही सन्मान द्यावा. त्यांना कामगार समजू नये तर आपल्या कुटुंबातील एक भाग समजावे. जेणेकरुन शाळा वाढेल. शाळेची किर्ती दुरदूर जाईल. त्यातच मराठी शाळाही टिकतीलच. वाढतील व पटसंख्याही वाढेल. हे तेवढंच खरं.
-अंकुश शिंगाडे
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments