जिल्हा परिषदेच्या शाळा दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी ‘आप’ने ‘झोप काढू’ आंदोलन जी.प. समोर केले
बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांची दुरवस्था सुधारण्यासाठी आणि त्यांना आवश्यक मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी आम आदमी पार्टी (आप) ने ‘झोप काढू’ आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश सचिव सुग्रीव मुंडे महाराष्ट्र सचिव या आंदोलनास आवर्जून उपस्थित राहिले व माजी सैनिक अशोक येडे, जे ‘आप’चे जिल्हाध्यक्ष , यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
‘आप’च्या शिष्टमंडळाने बीड जिल्ह्यातील काही शाळांची पाहणी केली असता, त्यांना अनेक गंभीर समस्या आढळल्या. यामध्ये शाळांच्या इमारतींची खराब झालेली स्थिती, काही ठिकाणी शौचालये आणि पिण्याच्या पाण्याची सोय नसणे, तर काही शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता अशा बाबी समोर आल्या आहेत. काही शाळा तर भाड्याच्या इमारतींमध्ये किंवा झाडांखाली भरत आहेत. ‘आप’ने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सरकार या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत आहे, जणू काही ते झोपलेच आहेत.
याच कारणामुळे, सरकारला जागे करण्यासाठी आणि या शाळा वाचवण्यासाठी उपाययोजना करण्याची आठवण करून देण्यासाठी २१ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत ‘झोप काढू’ आंदोलन करण्यात येणार आहे. हे निवेदन मुख्यमंत्री, पालकमंत्री, आणि शिक्षणमंत्री यांना बीडच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत निवेदन मुख्यमंत्री शिक्षा मंत्री जिल्हाधिकारी महोदय मराठवाडा आयुक्त देण्यात आले आहे. या आंदोलनात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ‘आप’ने केले आहे.
यावेळी ‘आप’चे जिल्हाध्यक्षअशोक येडे, सहदेव खंडागळे, कैलासचंद पालीवाल, माऊली शिंदे, भीमराव कुठे जिल्हाध्यक्ष बामसेफ नितीन सोनवणे जिल्हाध्यक्ष ऑल इंडिया पॅंथर नितीन जायभाय बीड शहर बचाव मंच डीजे तांदळे सर शिक्षक संघटना अशोक जोगदंड संतोष जोगदंड यांना सय्यद सादेक, शहराध्यक्ष मिलिंद पाळणे, रफिक पठाण, कृष्णा जगताप तालुकाध्यक्ष बीड, व्यंकट मुंडे परळी राजेश देशमुख परळी शहराध्यक्ष नासिर मुंडे साहेब केज तालुका अध्यक्ष सुहास चौधरी आष्टी तालुकाध्यक्ष रफिक पठाण अल्पसंख्याक विभाग प्रमुख डॉक्टर दीपक कोल्हारआणि आजम खान यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.