Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादग्रामीण भागातील शाळा बनली हायटेक; भडजी ग्रामपंचायत सदस्य गवळे यांच्या प्रयत्नांना यश

ग्रामीण भागातील शाळा बनली हायटेक; भडजी ग्रामपंचायत सदस्य गवळे यांच्या प्रयत्नांना यश

ग्रामीण भागातील शाळा बनली हायटेक; भडजी ग्रामपंचायत सदस्य गवळे यांच्या प्रयत्नांना यश

खुलताबाद/प्रतिनिधी/ खुलताबाद तालुक्यातील भडजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वर्ल्ड व्हिजन इंडिया संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना बसण्यासाठी तीन लाख रुपयांच्या किमतीचे बेंचेस देण्यात आले. या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना चांगली बसण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

ग्रामपंचायत सदस्य व माजी शालेय समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर बाळा गवळे यांनी वर्ल्ड व्हिजन इंडिया संस्थेच्या संपर्कात राहून सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येत संस्थेच्या वतीने शाळेस ही महत्त्वपूर्ण मदत मिळाली.या बेंचेसच्या लोकार्पण सोहळा मंगळवारी वर्ल्ड व्हिजन इंडियाचे डायरेक्टर डॉ. अनिल खांडेकर, व्यवस्थापक शैलेंद्र गोफणे,कार्यक्रम समन्वयक चामुला वळवी,याकूब खान व प्रकाश फुलझले यांच्या हस्ते संपन्न झाला.

कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रतन रावसाहेब वाकळे, अनिल विठ्ठल वाकळे, ग्रामरोजगार सेवक भगवान गंगाधर वाकळे, ग्रामपंचायत कर्मचारी विजय साहेबराव वाकळे,माजी उपसरपंच आप्पाराव लहानू वाकळे, माजी सदस्य बद्रीनाथ वाकळे, बाबासाहेब नानासाहेब वाकळे, प्रभाकर वाकळे आदी मान्यवर, ग्रामस्थ व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्राम पंचायत सदस्य ज्ञानेश्वर गवळे यांनी या शाळेसाठी सातत्याने केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. त्यांच्या पुढाकारामुळे शाळेच्या अवस्थेत मोठा बदल घडून आला असून, विद्यार्थ्यांसोबतच पालक वर्गामध्येही समाधान आणि आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. अनेकांनी ही शाळा आता “काया पालटलेली शाळा” म्हणून गौरवली आहे.

या उपक्रमामुळे शाळेच्या शैक्षणिक वातावरणात सकारात्मक बदल होऊन विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार आहेत, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments