Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादजिल्हा परीषद प्राथमिक शाळा रामजीनगर येथे भरली बालवारकरी यांची विठ्ठल नामाची शाळा

जिल्हा परीषद प्राथमिक शाळा रामजीनगर येथे भरली बालवारकरी यांची विठ्ठल नामाची शाळा

जिल्हा परीषद प्राथमिक शाळा रामजीनगर येथे भरली बालवारकरी यांची विठ्ठल नामाची शाळा
आत्ताच एक्सप्रेस
सोयगाव/प्रतिनिधी/  सोयगाव केंद्रातील उपक्रमशील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामजीनगर येथे सालाबादाप्रमाणे आषाढी एकादशी निमित्ताने सोयगाव गटशिक्षणाधिकारी सचिन शिंदे व केंद्र प्रमुख फिरोज तडवी यांच्या मार्गदर्शनाने बालवारकर्याची शाळे पासून ते विठ्ठल रूख्मिणी मंदीर आमखेडा पर्यत पायी दिंडी काढण्यात आली.शाळेतील बालवारकरी यांनी अभंग म्हणून संपूर्ण परीसरात भक्तिमय वातावरण निर्माण केले.या वेळी रुद्र शरद पवार या विद्यार्थ्याने विठ्ठलाची तर डिंपल अनिल ठोंबरे या विद्यार्थीनीने रुख्मिणी मातेची सुंदर अशी वेशभुषा तर इतर विद्यार्थी,विद्यार्थीनीनी वारकर्याची वेशभुषा परीधान केलेली होती. जणूकाही “विठ्ठल नामाची शाळा भरली,शाळा शिकतांना तहान भूक हरली या अभंगा प्रमाणे” जिल्हा परीषद प्राथमिक रामजीनगर शाळेत बालवारकर्याची विठ्ठल नामांचीच शाळा भरली होती व बालवारकरी विठ्ठल नामात रंगुन गेले होते.वयावेळी अगस्तमुनी वारकरी संस्थेतील ह.भ.प.शरद महाराज पवार यांचे व त्यांच्या विद्यार्थ्याचे अनमोल सहकार्य लाभले.‌दिंडी मध्ये बालवारकरी यांनी सुंदर अशा फुगड्या खेळण्याचा आनंदही घेतला.यावेळी वैशाली पवार उपाध्यक्षा शालेय व्यवस्थापन समिती,सदस्या मनिषा जेठे,पालक प्रवीण जाधव,शाळेचे मुख्याध्यापक किरणकुमार पाटील सहशिक्षक जी.जी.चौधरी,प्रशिक्षक शिक्षक शुभम देसले यांनी परिश्रम घेतले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments