शेतकरी व विद्यार्थी संवाद कार्यक्रम कचनेर येथे संपन्न
छ. संभाजीनगर/ येथे शेतकरी विद्यार्थी संवाद हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात कृषी महाविद्यालय, बदनापूर येथील कृषीदुतांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात शेतकऱ्यांना कापसावरील एकात्मिक कीड व्यवस्थापन यांवर सविस्तर माहिती देण्यात आली. या संवादातून शेतकरी व विद्यार्थी यांच्यात प्रत्यक्ष अनुभव व आधुनिक तंत्रज्ञानाची देवाणघेवाण झाली.
या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच व गावकरी यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. तसेच सदरील कार्यक्रमांसाठी कृषी महाविद्यालय बदनापूर चे प्राचार्य डॉ. डी. के. पाटील, डॉ. एस.सुपेकर, डॉ एन. डी. देशमुख तसेच NARP, छ. संभाजीनगर येथील डॉ सु. बा. पवार, डॉ. डी. एस. मुटकुळे यांचे मार्गदर्शन लाभले.