शेख तय्यब शब्बीर यांनी दिल्लीत भारत निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले
माजलगाव/प्रतिनिधी/ जिल्हा परिषद उर्दू हायस्कूल, पात्रुड (तालुका माजलगाव, जिल्हा बीड) येथे कार्यरत असलेले शिक्षक शेख तय्यब शब्बीर यांनी अलीकडेच भारत निवडणूक आयोगाच्या वतीने दिल्लीत आयोजित करण्यात आलेले विशेष प्रशिक्षण कार्यक्रम (Booth Level Officer – BLO Training) यशस्वीपणे पूर्ण केले आहे.
हे प्रशिक्षण राष्ट्रीय स्तरावर निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून फक्त एका प्रतिनिध्याची निवड करण्यात आली होती. माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी शेख तय्यब शब्बीर यांची निवड करण्यात आली होती
या प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान मतदार यादींची तयारी, मतदार नोंदणी, निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि तांत्रिक पैलूंवर आधुनिक मार्गदर्शन प्रदान करण्यात आले. शेख तय्यब शब्बीर यांनी या कार्यक्रमात उल्लेखनीय सहभाग घेत आपल्या क्षमतेचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.
या यशाबद्दल माननीय SDM साहेब, मा. तहसीलदार साहेब, नायब तहसीलदार साहेब निवडणूक, निवडणूक विभागाचे श्री चव्हाण सर, शिंदे सर, आपरेटर मोहंमद भाई, मा. शाळा पात्रुड चे मुख्याध्यापक अतहर फातेमा बाजी , शालेय व्यस्थापन समिती चे जुबेर भाई मोमीन, सर्व सदस्य, केंद्र प्रमुख प्रभाकर साळवे सर, शाळेतील सर्व सहकारी शिक्षक , ज्येष्ठ सहकारी शिक्षक फारुकी सर, तसेच सर्व BLO बांधव यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले .