शेवगाव पोलीस स्टेशनची दबंग कारवाई. ८आरोपीसह १३,३५,४००रू.मुद्देमाल जप्त
आत्ताच एक्सप्रेस
शेवगाव/ विशेष प्रतिनिधी : २ गावठी कट्टे, ८ जिवंत काडतुसे, ४ मॅग्झीन, दोन स्कॉर्पीओ गाड्या व ११मोबाईल असा एकुण -१३,३५,४०० रु किंमतीचा मुद्देमालासह ०८ आरोपी बसस्थानक परिसरात जेरबंद.
या बाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक ०३/०४/२०२५. रोजी पहाटे ३:३०.वाजताचे सुमारास पोनि समाधान नागरे यांना गोपनीय बातमीदारा कडून माहिती मिळाली की, पैठण तालुका संभाजीनगर येथून दोन स्कार्पिओ वाहनांमध्ये काही इसम हे शेवगाव जिल्हा अहिल्यानगर येथे येणार असून सदर इसमांकडे गावठी बनावटीचे कट्टे आहेत अशी माहीती मिळताच पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी पोलीस स्टेशनचे स.पो.नि. धरमसिंग सुंदरडे,स.पो.नि.अशोक काटे, पो.ना. ५१९/आदिनाथ वामन, पो.कॉ. ०३/शाम गुंजाळ, पो.कॉ. ८२९/राहुल खेडकर, पोकॉ राहुल आठरे, चा.पो.ना धायतडक,पो.हे.कॉ. गोरे,स फौ.वाघमारे व होमगार्ड अमोल काळे , शिदें,रवि बोधले यांना शेवगाव पोलीस स्टेशन समोरील क्रांती चौक या ठिकाणी बोलावून घेतले. सदर ठिकाणी नाकाबंदी करीत असताना आज रोजी पहाटे ५:००.वाजताचे सुमारास दोन स्कार्पिओ वाहन एम एच १६. ए.बी. ५४५४ व एम एच १७ ए झेड ४१९९ हे पैठण ते शेवगाव या रोडने क्रांती चौक या ठिकाणी येत असताना पोलीस स्टाफ यांनी सदरचे दोन्ही वाहने अडवली.दोन्ही वाहनांपैकी एम. एच. १६ ए.बी.५४५४. या सकार्पिओ कंपनीच्या गाडी मध्ये एकूण पाच इसम मिळून आले व एम.एच.१७ए.झेड ४१९९. या वाहनांमध्ये तिन इसम मिळून आले त्यावेळी आम्ही त्यांचे ताब्यात मिळून आलेल्या वाहनाची झडती घेवुन एम.एच.१६. ए.बी.५४५४ या वाहनात मिळून आलेल्या पाच इसमांना त्यांचे नाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव व पत्ता ०१) अंकुश महादेव धोत्रे वय २४. वर्ष धंदा-मजुरी राहणार बोरगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर ०२) शेख आकिब जलील वय २७ वर्षे धंदा -आरटीओ एजंट राहणार मुकुंद नगर इनाम मजेत अहिल्यानगर ०३) सुलतान अहमद शेख वय ४७ वर्ष धंदा ड्रायव्हर राहणार गोविंदपुरा अहिल्यानगर ०४) दीपक ज्ञानेश्वर गायकवाड वय २५. वर्षे धंदा मजुरी राहणार शिवाजीनगर कल्याण रोड, अहिल्यानगर ०५) मुक्तार सय्यद सिकंदर वय ४० वर्ष धंदा प्लंबर राहणार अहिल्यानगर तालुका अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर अशी सांगितली तसेच वाहन क्रमांक एम एच-१७ एक.झेड. ४१९९ या वाहनात मिळून आलेल्या तीन इसमांना त्यांचे नाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव व पत्ता १) पापाभाई शब्बीर बागवान वय २७ वर्षे धंदा- मजुरी रा.वेस्टर्न सीटी श्रीरामपुर ता.श्रीरामपुर जि.अहिल्यानगर २) सोहेल जावेद कुरेशी वय २२ वर्षे धंदा- मजुरी रा.फातेमा हाऊसींग सोसायटी श्रीरामपुर ता.श्रीरामपुर जि.अहिल्यानगर.३) आवेज जुबेर शेख वय २८ वर्षे धंदा- मजुरी रा.मिल्लतनगर, वार्ड क्र.०१ श्रीरामपुर ता.श्रीरामपुर जि.अहिल्यानगर अशी सांगीतली. त्यानंतर आम्ही पोलीस स्टाफ यांनी मिळुन आलेल्या वाहनांपैकी एम एच १६,एबी ५४५४. या वाहनाची झडती घेतली असता सदर वाहनाचे ड्रायवर सीटच्या बाजुचे सीटच्या समोरील ड्रावर मध्ये एक गावठी कटटा दोन मॅगझीन व ०४ जिवंत राऊंड:(काडतुस) मिळुन आले.तसेच एम एच १७ एझेड ४१९९. या वाहनाची झडती घेतली असता सदर वाहनाचे ड्रायवर सीटच्या बाजुचे सीटच्या पाठीमागे सिट कव्हरमध्ये एक काळया रंगाची हॅन्ड बॅग मिळून आली असता त्यामध्ये एक गावठी कटटा, दोन मॅगझीन व ०४ जिवंत राऊंड (काडतुस) मिळुन आले.सदर मिळुन आलेल्या अग्णीशस्त्राबाबत वाहनातील ईसमांना विचारना केली असता त्यांनी काहीएक समाधानकारक उत्तर दिले नाही.तसेच सदर अग्णीशस्त्रा बाळगण्याचा कोणताही वैध परवाना त्यांचेकडे नसलेबाबत सांगीतले.त्यामुळे सदर ईसमांचे ताब्यात बेकायदेशिररित्या अग्णीशस्त्र मिळुन आल्याने आंम्ही सदर ईसमांची अंगझडती व वाहनाची झडती घेतली असता त्यांचे अंगझडतीत व ताब्यात खालील वर्णनाचा व किंमतीचा मुददेमाल मिळुन आला.सदरच्या कार्यावाहीतध्ये खालील प्रमाणे आरोपीच्या अंगझडतीमध्ये मुददेमाल मिळुन आला आहे १. ७०,००० रु कि.चे देशी बनावटीचे दोन गावठी कटटे जु.वा.किं.अं २. २,०००. रु कि.चे देशी बनावटीचे चार मॅक्झीन जु.वा.किं.अं. ३. ४०० रु किं.चे जिवंत राऊंड (काडतुस) ७.६५. MM चे ०८ जिवंत राऊंड (काडतुस) जु.वा.किं.अं. ४,५०० रु कि.चा गावठी कटटा ठेवण्याठी बॅग जु.वा.किं.अं. ५,५२५००.रू. कि.चे आरोपींच्या अंगझडतीमध्ये एकुण ११ मोबाईल मिळुन आले असुन सदर मो.बा.ची जु.वा.किं.अं ६,१२ १०,०००/रु कि.च्या आरोपींच्या ताब्यातील ०२ स्कॉर्पिओ गाडया जु.वा.किं.अं. १३,३५,४००/- एकूण किंमत वरील मुद्देमाल दोन पंचाचे समक्ष जप्त करुन सदर आरोपी आरोपी नमुद आरोपी यांचे विरुद्ध पो.ना. ५१९ आदिनाथ तुकाराम वामन यांचे फिर्यादी वरुन शेवगाव पोलीस स्टेशन गु.र.नं.३०९/२०२५.
भारतीय शस्त्र अधिनियम कायदा कलम ३/२५. प्रमाणे दिनांक ०३/०४/२०२५. रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
शेवगांव शहरात दंगल घडुन गेल्यानंतर छेडछाड गुन्हेगारी प्रवृत्ती दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा घटना घडण्याचे प्रमाण सातत्त्याने वाढत आहे. होऊ घातलेल्या रामनवमी हनुमान जयंती आणि छत्रपती संभाजी महाराज जयंती सुरळीत पार पाडण्याचे आव्हान शेवगांव पोलिसप्रशासना समोर आहे सदर गुन्ह्यातील आरोपी यांना अटक करण्यात आली असुन पुढीत तपास सपोनि धरमसिंग सुंदरडे हे करीत आहेत. तसेच ही धडक कारवाई शेवगांव पोलीस यांनी केली असुन या पकडल्या गेलेल्या भामट्यांचा उद्देश चोरी दरोडा का घातपात घडवण्याचा होता हे अधिक तपासानंतर कळेल.