Tuesday, April 7, 2026
Homeऔरंगाबादसय्यद सादिक अली यांनी बीडच्या भुयारी गटार प्रकल्पाच्या अर्धवट अवस्थेविरोधात राष्ट्रपती कार्यालयात...

सय्यद सादिक अली यांनी बीडच्या भुयारी गटार प्रकल्पाच्या अर्धवट अवस्थेविरोधात राष्ट्रपती कार्यालयात पिटिशन दाखल केली नागरिकांचे आरोग्य धोक्यात, प्रशासनाची निष्क्रियता कायम

सय्यद सादिक अली यांनी बीडच्या भुयारी गटार प्रकल्पाच्या अर्धवट अवस्थेविरोधात राष्ट्रपती कार्यालयात पिटिशन दाखल केली
नागरिकांचे आरोग्य धोक्यात, प्रशासनाची निष्क्रियता कायम
बीड/प्रतिनिधी/ बीड शहरातील नागरिकांचे आरोग्य आणि जीवनमान धोक्यात आले असूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याच्या पार्श्वभूमीवर बीडचे रहिवासी सय्यद सादिक अली सय्यद यांनी राष्ट्रपती कार्यालयात पुन्हा एकदा पिटिशन (तक्रार) दाखल केली आहे. ही तक्रार 1 जुलै 2025 रोजी, नोंदणी क्रमांक PRSEC/E/2025/0038972 अंतर्गत स्वीकारण्यात आली आहे.
तक्रारीत त्यांनी दिनांक 29 जून 2025 रोजी राष्ट्रपती सचिवालयाकडे केलेल्या पूर्वीच्या निवेदनावर अजूनही कोणतीही कृती न झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बीड शहरात ₹165.80 कोटींचा AMRUT योजनेंतर्गत भुयारी गटार प्रकल्प गेल्या अनेक महिन्यांपासून अर्धवट स्थितीत आहे. या प्रकल्पाच्या ठप्प झालेल्या कामांमुळे संपूर्ण शहरात सांडपाणी रस्त्यावर वाहते आहे, दुर्गंधी पसरली आहे आणि डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो यांसारख्या रोगांनी नागरिक त्रस्त झाले आहेत.
21 सप्टेंबर 2022 रोजी झालेल्या बैठकीत कार्यकारी अभियंता श्री. के. बी. चिवारे यांनी STP (Sewage Treatment Plant) व वेट वेल्ससाठी आवश्यक असलेल्या जमिनीचा अभाव असल्याचे सांगितले होते. मात्र, त्यानंतर देखील कोणतेही नियोजन किंवा कार्यवाही करण्यात आली नाही.
सदर निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत:
अर्धवट असलेली भुयारी गटार योजना तात्काळ पूर्ण करावी.
STP आणि वेट वेल्ससाठी आवश्यक जमीन त्वरीत उपलब्ध करून द्यावी.
संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासनिक कारवाई करावी.
तातडीने सार्वजनिक आरोग्यविषयक उपाययोजना राबवाव्यात.
या प्रकल्पाची प्रगती जनतेपुढे पारदर्शकपणे मांडावी.
सय्यद सादिक अली यांनी सांगितले की, “बीडकरांचे आरोग्य धोक्यात आले असून प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे संपूर्ण शहराचा श्वास घुटमळत आहे. नागरिकांना या गंभीर स्थितीतून वाचविण्यासाठी राष्ट्रपती कार्यालयाने तातडीने लक्ष घालावे आणि संबंधित यंत्रणांना सक्त आदेश द्यावेत.”
सद्यस्थितीत ही तक्रार राष्ट्रपती सचिवालयाच्या पोर्टलवर “प्राप्त” स्थितीत दाखवली गेली आहे. बीडमधील नागरिक आता या गंभीर समस्येवर केंद्र शासनाकडून तातडीने ठोस कृती होईल, अशी अपेक्षा करत आहेत.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments