Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादसावळदबारा–देऊळगाव गुजरी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती करावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे...

सावळदबारा–देऊळगाव गुजरी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती करावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोयगाव तालुका संघटक गुलाबराव कोलते यांनी दिले

सावळदबारा–देऊळगाव गुजरी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती करावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोयगाव तालुका संघटक गुलाबराव कोलते यांनी दिले
सोयगाव तहसीलदार यांना निवेदन 
सावळदबारा/प्रतिनिधी/  सावळदबारा–देऊळगाव गुजरी या महत्त्वाच्या मार्गावर मोठमोठे खड्डे झाल्यामुळे नागरिक व वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याने अपघातांची शक्यता वाढली आहेत.
हा १० किलोमीटर या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या मार्गाचा वापर सावळदबारा, देव्हारी, नांदातांडा, घाणेगाव, मोलखेडा, टिटवी, पळसखेडा, महालब्धा, पिंपळवाडी, मूर्ती अशा अनेक गावांतील नागरिक दररोज कामानिमित्त ये- जा करतात.
सावळदबारा येथे श्री चक्रधर स्वामी मंदिर असल्याने विविध राज्यांतून येणारे भाविक मोठ्या प्रमाणात याच मार्गाने प्रवास करतात. तसेच सावळदबारामध्ये ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, शाळा, कॉलेज, महावितरण कार्यालय, पोस्ट ऑफिस, पोलीस चौकी, पशुवैद्यकीय दवाखाना, प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोयगाव तालुका संघटक गुलाबराव कोलते यांनी तहसीलदार सोयगाव यांना निवेदन देवून रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली आहे.रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवून अशी निवेदनातून करण्यात आली आहेत यावेळी शेषराव पाटील, ताराचंद जाधव होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments