Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादसत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना करावे लागते प्रशासनाविरुद्ध आत्मक्लेष आंदोलन

सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना करावे लागते प्रशासनाविरुद्ध आत्मक्लेष आंदोलन

सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना करावे लागते प्रशासनाविरुद्ध आत्मक्लेष आंदोलन

कन्नड/ महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतर्गत मंजूर वैयक्तिक लाभांच्या योजनेचा कामे पूर्ण करूनही पं.स.कार्यालयाचे अंतर्गत मिळणारा अनुदान निधी वितरित होत नसले मुळे सत्ताधारी भाजपा पक्षाचे वतीने पं.स.कन्नड कार्यालया समोर आत्मक्लेष आंदोलन करावे लागले आहे.
महाराष्ट्र रोजगार हमी योजना तसेच पी.एम.आवास योजने अंतर्गत कन्नड तालुक्यातील अनेक गोर गरीब शेतकरी यांना वैयक्तिक लाभपोटी शासनाने सिंचन विहिरी,शेत तळे, वृक्ष लागवड,गाय गोठे,शेततळे सह  निवाऱ्यासाठी पी.एम.घरकुल योजने अंतर्गत मंजुरी मिळाली होती.सदर मंजुरी नुसार त्यातील 80% टक्के लाभार्थ्यांनी आपआपली कामे 100%पूर्ण केली.सदर कामे पूर्ण करणेसाठी लाभार्थ्यांनी सावकार,पाहुणे,नातेवाईक किंवा घरातील कुडूक मुडूक मोडून कामे पूर्ण केली.पण प्रतीक्षा करूनही पं.समिती कार्यालया कडुन त्यांचे बँक खात्यावर पुढील अनुदानची रक्कमच वर्ग होत नसले मुळे सर्व लाभार्थी मोठ्या वैयक्तिक संकटात सापडल्याचे दिसून येताच भाजपा पक्षाचे उप जिल्हाध्यक्ष सुभाष काळे व पक्षाचे अनेक पदाधिकारी यांचे वतीने पं.स.गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे यांना दि.16 रोजी एक निवेदन देऊन सदर रखडलेला निधी तात्काळ लाभार्थ्यांना कुठलीही चिरीमिरी न करिता वितरित करावा अशी मागणी केली होती.परंतु त्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येताच त्यांनी सोमवार दि.26 रोजी कार्यालयासमोरच अर्ध नग्न होऊन व स्वतःच्या अंगावर च्याबकांचे फटकारे मारून आत्मक्लेष आंदोलन केले.या बाबत गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे यांनी तात्काळ चक्रे फिरवून आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. व लेखी आश्वासन देऊन तात्काळ निधी वितरित करण्याचे आश्वासन दिले. व आंदोलनकर्त्यांचे आंदोलन शांत केले.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments