Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादमावसाळा ग्रामस्थांच्या वतीने सेवानिवृत्त सुभेदार वरकड यांची मिरवणूक व सत्कार

मावसाळा ग्रामस्थांच्या वतीने सेवानिवृत्त सुभेदार वरकड यांची मिरवणूक व सत्कार

मावसाळा ग्रामस्थांच्या वतीने सेवानिवृत्त सुभेदार वरकड यांची मिरवणूक व सत्कार

खुलताबाद पोलीस स्टेशनच्या वतीने नुकतच साईनाथालातून सेवानिवृत्त झालेले सुभेदार पदावरून निवृत्त झालेले सुरेश नानाराव वरकड यांच्या सत्कार बीड जमादार शेख जाकीर किशोर गवळी सिद्धार्थ सदावर्ते यांनी केले यावेळी त्यांच्यासोबत ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच मनोज काळे हे होते

खुलताबाद/प्रतिनिधी/ खुलताबाद तालुक्यातील मावसाळा येथील भूमिपुत्र सैन्यदलातुन प्रदीर्घ सेवा देवुन सुभेदार पदावरून निवृत्त झालेले सुरेश नानाराव वरकड यांची रविवारी (दि.१३) ग्रामस्थांच्या वतीने मिरवणूक काढून सत्कार करण्यात आला. तालुक्यातील मावसाळा येथील सुरेश वरकड हे १९९७ ला सैन्यदलात भरती झाले, आपली २८ वर्षांची प्रदीर्घ सेवा बजावताना सुभेदार पदापर्यंत पोहचले व नुकतेच निवृत्त झाले. सैन्यदलात भरती झाल्यानंतर देशातील विविध सैनिकी केंद्रावर सेवा बजावतानाच नुकतेच ऑपरेशन सिंदूर मध्ये सहभागी होण्याचा मान मिळाला. सैन्यद लात आज पर्यंत मिळणारा मान सन्मान सेवा निवृत्ती नंतर मिळावा,तसेच निवृत्ती नंतर येणारया अडचणी केंद्रसरकाने तेवढ्याच तत्परतेने सोडवाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करतांनाच ग्रामस्थांनी काढलेली मिरवणूक, त्या अनुषंगाने झालेले स्वागत याबाबत कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी सुभेदार अशोक हांगे,शाळिग्राम पाटील, बबन शिंदे, विजय लहाने,एकनाथ गरड, जेष्ठ पत्रकार संजय वरकड, ह.भ.प. नारायण कोरडे, भा.ज.पा. विधानसभा संघटक विकास कापसे, भा.ज.पा. तालुकाध्यक्ष प्रकाश चव्हाण, चंद्रकांत भराड, ज्ञानेश्वर वरकड,मनोज काळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments