Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादसंत संताजी जगनाडे महाराज जयंती मुक्त विद्यापीठात साजरी

संत संताजी जगनाडे महाराज जयंती मुक्त विद्यापीठात साजरी

संत संताजी जगनाडे महाराज जयंती

मुक्त विद्यापीठात साजरी

 

नाशिक/प्रतिनिधी/ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मुख्यालयात संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठ प्रशासकीय इमारतीत झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे मा. प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन होते. त्यांच्या हस्ते संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी बोलतांना त्यांनी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवनकार्यास उजाळा दिला. विद्यापीठ व्यवस्थापन मंडळ सदस्य डॉ. संजीवनी महाले, ग्रामीण विकास व उद्योजकता विद्याशाखा संचालक प्रा. कैलास मोरे, उपकुलसचिव श्रीमती मीना वाडीले यांच्यासह विद्यापीठ विविध विद्याशाखा संचालक, प्राध्यापक, अधिकारी – कर्मचारी, शैक्षणिक समन्वयक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री. किशोर शिंदे यांनी सुत्रसंचलन केले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments