Monday, October 27, 2025
Homeऔरंगाबादसंत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत विभागीय तपासणी

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत विभागीय तपासणी

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत विभागीय तपासणी
आत्ताच एक्सप्रेस
सोयगाव /प्रतिनिधी /छत्रपती संभाजीनगर – संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत सन २०२२- २३ ची विभागीय तपासणी जिल्ह्यातील तालुका कन्नड – नादरपुर, तालुका सोयगाव – जरांडी ग्रामपंचायतीची तपासणी आज करण्यात आली
    .   . विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने तपासणी करण्यात आलेल्या ग्रामपंचायती मध्ये शाळा अंगणवाडी शौचालय, सार्वजनिक शौचालय, घनकचरा सांडपाणी व्यवस्थापन, परिसर स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, वृक्षारोपन, जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायतच्या वतीने विविध नाविन्यपूर्ण राबविण्यात आलेल्या उपक्रमाची पाहणी केली
         तपासणी पथकात जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत तथा जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक राजेंद्र देसले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधीक्षक अभियंता दीपक कोळी, जिल्हा माहिती अधिकारी डॉ मिलिंद दुसाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( रोहयो) उद्धव होळकर, विस्तार अधिकारी  दिलीप घुमरे पंचायत समिती सोयगाव चे गट विकास अधिकारी दादाराव अहिरे जिल्हा कक्षाचे माहिती शिक्षण  सल्लागार सतीश औरंगाबादकर क्षमता बांधणी तज्ञ राजेंद्र सोनवणे गट समन्वयक संतोष जाधव जरांडी ग्रामपंचायतच्या सरपंच स्वाती दिलीप पाटील, उपसरपंच संजय पाटील, ग्रामपंचायत अधिकारी सुनील मंगरूळे, माजी सरपंच वंदना पाटील तसेच ग्रामपंचायतचे सन्माननीय सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments