संस्कार प्रबोधिनी प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घेतला
भक्तांच्या सेवेचा आनंद
जालना/प्रतिनिधी/ जालन्यामधील प्रसिद्ध देवस्थान श्री. आनंदी
स्वामी महाराज यात्रेनिमित्त संस्कार प्रबोधिनी प्राथमिक विद्यालयातील
स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी भाविक भक्तांना प्रसादाचे वाटप केले.
प्रसाद भरणे, प्रसाद घेणार्या भाविकाला रांगेत येण्याची सूचना करणे तसेच
तेथील प्रसादगृहाची स्वच्छता देखील केली. आलेल्या भाविक भक्तांना रांगेत
उभे राहणे तसेच लवकर लवकर पुढे सरकणे इत्यादी सूचना देखील करण्यात आल्या.
स्काऊट गाईड उपक्रममधून विद्यार्थ्यांना सामाजिक कार्याची जाण व्हावी,
समाजाची सेवा घडावी, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळावा या
उद्देशाने स्काऊट मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम असतात. त्यामधीलच एक
उपक्रम संस्कार प्रबोधिनी प्राथमिक विद्यालयातर्फे घेण्यात आला आहे.
यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेचा पूर्ण गणवेश आणि सोबतच स्काउट मधील
स्कार्फ वॉगल घातला होता. या उपक्रमात स्काऊट मधून जयंत नंनवरे, कौस्तुभ
वैरागळ, रुद्र ढवळे, यश कांबळे, आयुष सरोदे, पुष्कर गुजर या
विद्यार्थ्यांनी शाळेतील स्काउट शिक्षक विपुल धोत्रे यांच्यासह सहभाग
घेतला.
