संकल्प भूमी बडोदा “धम्म अभ्यास दौरा- सहल.”
महाराजा सयाजीराव गायकवाड हे १८८१ ते १९३९ या काळात बडोदा संस्थानाचे दूरदृष्टीचे आणि पुरोगामी राजे होते.त्यांनी राज्यात मोफत,सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरू केले आणि स्त्री शिक्षण,दलितांचे शिक्षण व सामाजिक सुधारणांसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले.बाबासाहेब आंबेडकरांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देणारे ते पहिले राजे होते.त्यांचे त्याकाळचे प्रमुख कार्ये आणि योगदान आज ही प्रेरणादायी आणि लक्षवेधी आहे.त्यात शिक्षणा ला खूप महत्व दिले १९०१ मध्ये बडोदा संस्थानात मोफत,सक्तीचे आणि सर्वसमावेशक प्राथमिक शिक्षण सुरू केले.दलितांसह सर्व समाजातील मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या.भारताला पहिल्यांदा परदेशात शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याची सुरुवात केली,ज्याचा लाभ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना मिळाला.
व्यक्तिमत्त्व आणि वारसा सयाजीराव गायकवाड हे अत्यंत कर्तृत्त्ववान आणि प्रजाहितदक्ष राजा म्हणून ओळखले जातात.त्यांच्या दूरदृष्टीमुळे बडोदा संस्थानाने मोठी प्रगती केली.वडोदरा शहरामध्ये महाराजा सयाजीराव विद्यापीठ त्यांच्या कार्याचे प्रतीक आहे.
सयाजीराव यांनी भारताचे महान घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणासाठी दरमहा पन्नास रूपये शिष्यवृत्ती दिली होती. महाविद्यालयीन शिक्षणातील त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे, १९१३ मध्ये त्यांना बडोदा राज्याचे तत्कालीन महाराजा (राजा) सयाजीराव गायकवाड यांनी एमए आणि पीएच.डी. करण्यासाठी शिष्यवृत्ती प्रदान केली. महाराजांनी परदेशात त्यांचा शिक्षणाचा व वस्तीगृहाचा सर्व खर्च केला होता. त्यानंतर परदेशातून पदवी मिळवून आणल्यावर आंबेडकरांची महाराजांनी बडोद्यास सचिवालयामध्ये उच्च पदावरती नेमणूकही केली.
संकल्प भूमी हे गुजरात राज्यातील वडोदरा (बडोदा) येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित असलेले एक स्मारक व ऐतिहासिक स्थळ आहे. या स्थळाला दरवर्षी लक्षावधी लोक भेटी देत असतात.२३ सप्टेंबर १९१७ रोजी आंबेडकरांनी सयाजी बागेमध्ये आपल्या तत्कालीन दबलेल्या-पिचलेल्या अस्पृश्य समाजाला जातीयतेतून बाहेर काढण्यासाठी आपले जीवन समर्पित करण्याचा संकल्प केला होता. आंबेडकरांनी संकल्प केलेल्या सयाजी बागेतील त्या जागेला १४ एप्रिल २००६ रोजी “संकल्प भूमी” असे नाव देण्यात आले होते. गुजरात सरकारद्वारे तेथे आंबेडकरांचे एक भव्य स्मारक निर्माण करण्यात येणार आहे.ते पाहून प्रेरणा घेण्यासाठी भांडुप धम्म उपासिका संघा च्यावतीने संकल्प भूमी बडोदा “धम्म अभ्यास दौरा- सहल.” आयोजित केला आहे.
14808, दादर जोधपूर एक्सप्रेस,दिनांक २१ सप्टेंबर रात्री ११ वाजता निघायचे आहे.रात्री १२ नंतर २२ सप्टेंबर २०२५, सुरू होते.म्हणूनच रात्री दादर ला १२.१५ वाजता,गाडी मध्ये बसणे आहे, तेव्हा सकाळी वडोदरा,६.१० वाजता पोचू,रेल्वे गाडीचे तिकीट साठी पर्याय गाडी 19019 बांद्रा ते वडोदरा आहे.