आत्ताच एक्सप्रेस
गंगापूर/ प्रतिनिधी/श्रावणबाळ संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांकडून मंजुरी पत्र मागण्याची अट रद्द करावी संग्राम कैलास निकम पाटील यांनी आमदार प्रशांत बंब यांच्याकडे मेलद्वारे व व्हाट्सअप द्वारे निवेदन पाठवून मागणी केली आहे. शिवसेना दिव्यांग (अपंग) सहाय्यक सेना संग्राम कैलास निकम पाटील गंगापूर तालुका संघटक यांनी अशी मागणी केली आहे की. गंगापूर तहसील कार्यालयात दिव्यांग बांधवांना दर वर्षी प्रमाणे हयात पत्र देण्यात येते ते आता सुरू झाले आहे. परंतु आता हयात पत्र देण्यासाठी संजय गांधी निराधार योजना विभागातील अधिकारी मंजुरी पत्राची मागणी करत आहे. परंतु काही दिव्यांग यांच्याकडे मागील १५ ते २० वर्षापासून संजय गांधी निराधार व श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेत आहे. त्यांना आज रोजी हयात पत्र संजय गांधी विभागात जमा करण्यासाठी अधिकाऱ्याकडून मंजुरी पत्राची मागणी केली जात आहे. परंतु पंधरा ते वीस वर्षापासून जे लाभार्थी लाभ घेत आहे. त्यांच्याकडे सदर मंजुरी पत्र उपलब्ध नसल्यामुळे अधिकारी त्यांची अडवणूक करत आहे. यामुळे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना योजनेच्या लाभांपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी माननीय प्रशांत बंब साहेब यांनी मागणी करण्यात आलेल्या पत्राची तात्काळ दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना मागील १५ ते २० वर्षांपूर्वीचे लाभार्थी यांच्याकडून मंजुरी पत्र मागण्याची अट रद्द करण्यात यावी अशी मागणी संग्राम कैलास निकम पाटील यांनी केली आहे ,