Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादसांगली फळ महोत्सव 2025 मध्ये रु. नऊ लाखाची उलाढाल 

सांगली फळ महोत्सव 2025 मध्ये रु. नऊ लाखाची उलाढाल 

सांगली फळ महोत्सव 2025 मध्ये रु. नऊ लाखाची उलाढाल 

इस्लामपूर/प्रतिनिधी/  महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, कोल्हापूर व कृषि उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली बाजार समितीचे वसंतदादा स्मृती हॉल येथे आयोजित करण्यात आलेला होता. सदर सांगली फळ महोत्सव २०२५ मध्ये सांगली जिल्ह्यातील जत व कवठे महांकाळ तालुक्यातील पिवळे/गुलाबी ड्रॅागनफ्रुट, विटा व वाळवा तालुक्यातील पेरू, चिकू, केळी तसेच आटपाडीचे अंजीर, डाळींब, सिताफळ व विविध फळांची विक्री शेतकऱ्यांमार्फत करण्यात आली. या महोत्सवात एकूण २२ फळ उत्पादक शेतकरी यांनी सहभाग घेतलेला होता . फळ महोत्सवात तीन दिवसात तब्बल ९ लाख १२ हजार रूपयांची उलाढाल झालेली आहे. महोत्सवामध्ये विविध फळांचा देखावा लोकांचे आकर्षन ठरला. जत तालुक्यातील ड्रॅगन उत्पादक शेतकऱ्याने तयार केलेले ड्रॅागनफ्रुटचे आईस्क्रीम पहिल्यांदाच सांगली शहरवासीयांना चाखायला मिळाली . तसेचमॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत व्यंकटेश aagro यांनी तयार केलेली जांभूळ, लिंबू, पपई व स्ट्रॉबेरी पासून चि  उत्पादने महोत्सवात विक्रीसाठी उपलब्ध होती पणन मंडळाकडून आयोजित केलेल्या या महोत्सवा बाबत सहभागी झालेल्या श्री संभाजी कोडग,विजय मोरे, प्रविण कुंभार ईत्यादी शेतक-यांनी पणन विभागाचे आणि श्री अशोक काकडे जिल्हाधिकारी यांचे आभार मानले व पुढेही असेच महोत्सव आयोजित करणे बाबत विनंती केली.सांगली जिल्ह्यातील फळ उत्पादक शेतकरी यांना बाजारपेठ उपलब्ध करून देणे व मॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत फळांवर प्रक्रिया करून त्याची उत्पादने तयार करणेकरीता शेतक-यांना पणन मंडळामार्फत यापुढेही सहकार्य केले जाईल असे कृषी पणन मंडळाचे उप सर व्यवस्थापक डॅा. सुभाष घुले यांनी सांगीतले. यावेळी कृषी पणन मंडळाचे श्री ओंकार माने, श्री प्रतीक gonugade, श्री सुयोग टकले, श्री अनिल जाधव, संदेश पिसे श्री सुशांत खाडे हे उपस्थित होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments