संघटन हेच खरे बळ – श्री. रावसाहेब पाटील दानवे
जालना ग्रामीण जिल्हा अंतर्गत नविन रचने अंतर्गत 12 मंडळ अध्यक्षाच्या नियुक्त्या
जालना /प्रतिनिधी/ जालना ग्रामीण जिल्हा अंतर्गत नविन रचने अंतर्गत 12 मंडल अध्यक्ष निवडणूक घोषणा आज दिनांक 20 एप्रिल रोजी माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, आ.संतोष पाटील दानवे, आ.नारायण कुचे, घनसावंगी विधानसभा प्रमुख सतीश घाटगे व जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे यांच्या नेतृत्वाखाली घोषित करण्यात आल्या आहेत उर्वरित तीन मंडल अध्यक्ष निवडणूक घोषणा दिनांक 21 एप्रिल रोजी करण्यात येणार आहेत.
यामध्ये भोकरदन शहर मंडळ अध्यक्ष पदी – श्री. रणवीर देशमुख, पिंपळगाव रेणुकाई – श्री. गणेश भिकाजी इंगळे, सोयगाव देवी – श्री. दिपक जाधव, राजूर – श्री. गजानन सर्जेराव नागवे, जाफ्राबाद – श्री. ज्ञानेश्वर भागिले, टेंभूर्णी- श्री. मनोज शिंदे, बदनापूर – श्री. भगवान मात्रे, अंबड शहर – श्री. सौरभ कुलकर्णी, अंबड ग्रामीण – श्री. प्रदीप पवार, घनसावंगी – श्री. पुरुषोत्तम उढाण, शहागड – श्री. शिवाजी मोरे, जालना ग्रामीण (घनसावंगी) – श्री. संजय बंसीधर आटोळे यांचा समावेश आहे.
यावेळी बोलताना माजी केंद्रीय मंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे म्हणाले की, मंडल अध्यक्ष घोषणा करताना समाजातील सर्व स्तरातील घटकांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न साधारण पणे करण्यात आला आहे. आज झालेल्या नियुक्त्या ही केवळ आकडेवारी नाही, तर जनाधार आणि जनविश्वासावर आधारित असणारी शक्ती वाढवण्याचा प्रयत्न आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एका संघटित आणि समर्पित कार्यपद्धतीची ही सुरुवात आहे. आता अधिक गावखेड्यांपर्यंत पोहोचत, सर्वसामान्य मतदाराशी थेट संवाद साधत, भाजपा राज्यामध्ये अंत्योदयाच्या मार्गावर वाटचाल करत आहे. सर्व नवनियुक्त मंडल अध्यक्षांचे पुन्हा एकदा अभिनंदन ! तसेच “राष्ट्र प्रथम, त्यानंतर पक्ष आणि शेवटी स्वतः” हे सांगणारी भाजपा परिवाराची विचारधारा आपापल्या मंडल परिसरात नव्याने रुजवण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !
भारतीय जनता पार्टीच्या संघटन बांधणीला ‘संघटन पर्व’ अभियानाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नवे बळ लाभत आहे. या अंतर्गत ९६३ मंडल अध्यक्षांच्या नियुक्त्या पूर्ण झाल्या आहेत. भाजपा महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने नियुक्त करण्यात आलेल्या सर्व मंडल अध्यक्षांचे हार्दिक अभिनंदन विशेष म्हणजे भाजपा संघटन पर्व अभियानांतर्गत प्राथमिक आणि सक्रीय सदस्य नोंदणीला राज्यभरातून लाभलेला प्रचंड प्रतिसाद लक्षात घेत आता संपूर्ण राज्यभरात एकूण १२२१ मंडल गठीत करण्यात आली आहेत. यातील ९६३ मंडलांची रचना जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या १२२१ मंडलांपैकी २५८ मंडले ही नव्याने स्थापन करण्यात आली आहेत.
