Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादसमकालीन वास्तवाची सम्यक दृष्टी देणारी कविता:-'माती म्हणे आभाळाला

समकालीन वास्तवाची सम्यक दृष्टी देणारी कविता:-‘माती म्हणे आभाळाला

समकालीन वास्तवाची सम्यक दृष्टी देणारी कविता:-‘माती म्हणे आभाळाला

‘कवी एक सृजनशील भावनेचा आविष्कार असतो.तो मुक्त व्यक्त होतो.त्याचे मन अल्लड असते.तो फक्त शोधत असतो दुःखाचे मुळ.आणि शब्दांशी असते त्याचे कुळ.
जात धर्म पंथ या वल्गनेच्या पसाऱ्यात तो नाही अडकत.
म्हणून तो तथागत बुद्धांच्या सम्यक विचारांचा प्रज्ञावंत पाईक होतो आणि बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे
हाती घेतो निर्धारची धारदार शब्दशस्त्र.
“माझ्या लहानपणी भर उन्हाळ्यात सारी माणसं रानावनात कामाला गेल्यावर आमच्या घराच्या भिंतीला खेटून उभा असलेला पिंपळवृक्षाने त्याच्या नितळ सावलीत आम्हा लेकरांना आजोबा सारखं सांभाळलं त्या
पिंपळवृक्षास”.ही सविनय ऋणाईची अर्पणपत्रिका.
तथागतांच्या पंचशील तत्त्वांचे पालन आहे.
असे सर्व गोतावळ्यातील स्नेही सन्मित्र कवी गझलकार गणेश खरात यांच्या शासन अनुदान मान्यतेतून प्रकाशित झालेला “माती म्हणे आभाळाला”कवितासंग्रह म्हणजे,  समकालीन वास्तवाचे सम्यक दृष्टी देणारी कविता.ज्या भयावह जगण्याच्या दुनियेत संविधान विधिज्ञ कायद्याचे
पंडित श्रध्देय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे दिव्य तेजस्वीत्व वाचन अंगीकृत करून हा सर्वहरा वेदनेचा सम्यक सकारात्मक समर्पक सृजनशील भावनेचा आविष्कार म्हणजे कवी गणेश खरात यांची कविता.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांने समाज जागा झाला.हातात लेखणी व मस्तकात विचारांची मागणी  आली.बहुजनांचे मळे बहरले.कवी लिहितो,
“भाकरीचा प्रश्न सुटल्यावर
सुखाचा सुस्कारा सोडत
सारे स्वप्नवत भासतं होते..
खिशाला पेन लाऊन,
हलकस स्मित करीत
मला बाबासाहेब दिसत होते.”.(पृष्ठ ९६)या कवितेने आंबेडकरी विचार आचार संहितेचा माणूस घडविणारे शस्त्र ‘शिका, संघटीत व्हा संघर्ष करा’.जो अटळ आहे.
या समकालीनात आज सर्वहरा समाजाला जान व भान
आले आहे.माती आभाळाशी नातं ही विचारांची नीती व माती या आभाळाला म्हणते..तू बदलू नको सरड्या सारखे रंग.रंग ही बेरंग होऊ देणारं नाही.इथल्या जीवांसाठी.ही मातीची महती या कवितेने दिली आहे.ओला कोरडा दुष्काळ हे अनेक युगांचे संचित आहे.याला कारणीभूत
माणुसचं.कारण त्याला त्याचे सुख कळाले नाही.शांती त्यांने अशांती होऊन गेली आहे.माणसाचा हलकट स्वार्थ.
माती ही आभाळाची मायचं आहे.ती आभाळाला विनवणी करते.तू प्रत्येक हंगामात वेळवर येत जा.पण ऋतूचे चक्र
माणसांच्या अनितीने बदले आहे.पाणी,झाडे,डोंगर,सागर
मातीचा ही अति प्रमाणात वापर तो त्याच्या स्वार्थ गोष्टी करू लागला म्हणून मानवाला निसर्गाच्या या भयंकर चक्राला सामोरे जावे लागते आहे.ऋतूचा ताळमेळ राहिला नाही.सारं नी सगळेचं अति होतंय आहे.कवी लिहितो, तत्कालीन परिस्थिती.
“कुठं दिसना हिरवळ,होई उन्हामध्ये आग.
रानं झालंय ओसाड,कशी सोसायची धग
यावं हळूच सरींनी,वाजवीत ढगढोल
माती म्हणे आभाळाला, थोडं मनातलं बोल “(पृष्ठ २६)
‘एक काळ होता,बाळा, गझल माझी, जगणं घडवित आहे,
कोरड्या डोळयात स्वप्न,पेचात गावं आहे.या कवितेचा मर्मग्राही अनुबंध हाच आहे की, माणूस माणूसकीला दुरवला आहे.आपल्यावर अनेक मातांचे ऋण आहे त्यात
‘माते रमाई’विषयी ऋणाई व्यक्त केली आहे.मन,’मातीतला माणूस,माती म्हणे आभाळाला, डायरीतल्या किरकोळ नोंदी,सुखाचा चांदणं:माहेर, उमटते कवितेचे ओळ, आठवणींच्या फांद्या, जिंदगीवर भार आहे,या मुक्त कविता
आणि एक मतला दोन शेर या गझलेच्या अति उच्च टोकाचे चिंतन आशय ही कविता देऊन जाते जसे,
“सांजवेळी ऐकतो,मी आर्त गाणी.
वाटते मज दुःखही दिलदार आहे
जीवनावर भाष्य ज्यांचे अमर झाले
गौतमाचे तत्व त्याचा सार झाले….(पृष्ठ ३३)
माणसांच्या क्षणिक सुखाची लालसा व समाज परिवर्तनाचा सामाजिक वसा व वारसा या कवितेमधून
परिप्रेक्ष्यात अतिशय उत्तम आशय घेऊन सृजनशील भावनेचा दस्तऐवज ही कविता संयत विद्रोही सांस्कृतिक
मूल्य देऊन जाते.या भारतावर्षाला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ‘सविधान’दिले हिच सम्यक विचारांची माती आभाळभर झाली. नितळ निर्लेप आभाळ भरून आलं.आपल्या जगण्याला वैचारिक अधिष्ठान प्राप्त झाले.सार्वभौम सत्तेचं महत्त्व प्राप्त झालं.’खंत नाही, कर्म,बोल मित्रा, पायपीट, हिरवंगार नातं, इच्छांच्या हिरव्या गार फांद्या या कवितेचा आशय माणूस जात पात धर्म पंथ या रायरंदी विळख्यात अजूनही आहे.
‘बापमाणूस:डॉ बाबासाहेब आंबेडकर’
“बा भिमानं दाविली, मला इशाऱ्यानं शाळा
तवा कुठं फुलला, मह्या संसाराचा मळा.
कष्टाच्या भाकरीवर,आता इज्जतीचं जिणं
मह्या उभ्या जिंदगीला,बा भिमाचं देणं..”(पृष्ठ ४२) खरंच
या मातीचे अनंत उपकार आहेत.ज्या मायभूमीवर इथे
महापुरुषांचा जन्म झाला.त्यांनी सद्वविवेकी विचारांची सत्यनिवेशी पेरणी केली.आणि दाखवून दिले.ज्ञान प्रज्ञेचा
प्रकाश.ही कविता शब्द विचारांच्या मातीची महती सांगत नाही तर मानवी मूल्यांची पेरणी करते.जसे,
“जहरी दुःखे पचवत आलो, ताकद आली
आधाराची कुबडी मजला लागत नाही
ध्येयामागे पळता पळता इतके कळले
अपघाताला कारण ठरते गडबड घाई “(पृष्ठ,९३) ही सविनय मतला व गझल कवीच्या जगण्याची खडतर गाथा
मांडते.अनेक पिढ्यांनी मनावर मनभर घाव घेतले.आता शब्दाने मनाचा धारधार निर्धाराची भाषा ही कविता करते.
बुध्द ही मानवी मनाची शुद्ध धारणा जो करतो तो आपले मनोज्ञ भाव विश्वात जगतो.तथागताने जगला शांतीचा मार्ग
दिला.सुखाचे चांदणे आयुष्यात आले.बुध्द: सुखाचं चांदणं
“बुध्द अपार करुणा, जणू सुखाचा चांदणं
धम्माच्या छताखाली, गुण्यागोविंदानं नांदनं
सारं उलथून पडलं,क्रुर युध्दाच्या अंती
अख्खा जगाला कळालं,तवा बुद्धाची शांती”..(पृष्ठ ५४)
या माती म्हणे आभाळाला!ही सविनय प्रार्थनाचंआहे
त्यात ‘कविता काय असते?’हळव्या मनाला भुरळ घालणारी प्रेयशीची आस, मरेपर्यंत नुसतेच भास,हे झालं
भारल्या मनाचं गारुड.पण खरंच आईच्या पदराआडाचा गुदमरला श्वास.लढण्याची ढाल, दुःखाला गुणगुणारी संगीतमय चाल, कविता येतं नाही तळतळणी ती ओंजळभर दुःखाची सल घेऊन येते.कवितेनं काय दिलं तर एक भावनेचा कल्लोळ.म्हणून दुःखाला ही खरपूस भाजून कवीने जवीने गात रहाणं..कवी लिहितो,
“गरीबाच्या झोपडीतील,
भाकरीचा घास असते
गरीबासाठी पुरणपोळीचा
झालेला भास असते कविता.”.(पृष्ठ ५६) ही कविता संयत मनोभूमिकेतून अस्सल होतं गेली आहे.
म्हणून गणेश खरात आपल्या काव्य प्रतिभेने गझल व मुक्तछंद,अष्टाअक्षरी या कवितेचा आत्मा घेऊन सृजनशीलतेने माती म्हणे आभाळाला हे शिर्षक सर्वव्यापक समष्टीची प्रार्थना करते.या कवितेचा मुळ आत्मा हा मानवी मूल्यांची बंधुत्वाची व आजच्या माणुसघान्या प्रवृतीची कानपिचक्या देतो.या कवितेचे
प्रतिभा व प्रतिमांच्या माध्यमातून ही कविता अतिशय आशय संपन्न सृजन समर्पक विवेचक झाली आहे.
कवी गणेश खरात यांच्या कवितेवर अतिशय
कवी हबीब भंडारे यांची चिंतन चिकित्सक आशय संपन्न प्रस्तावना ते लिहितात “कवी गणेश खरात ‘यांचा माती म्हणे आभाळाला’हा पहिला कवितासंग्रह असला जरी अनुभूती, मूल्यात्मक, अभिव्यक्ती, जीवनदायी विचार, संवेदनाशीलता, संवेदना, आशयाच्या दृष्टीने संग्रहातील कविता अतिशय सकस व महत्त्वपूर्ण आहे” ख्यातनाम चित्रकार श्रीधर अंभोरे यांचे मुखपृष्ठ म्हणजे माय,माती, मातेचे चरण कमल,उगवून येणार कोवळा कोंब,या आशय गर्भित मूल्य देणारा  लक्षवेधी ठरावा ही सविनय शुभेच्छा.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments