संबोधी बुद्ध विहार गोरेगाव येथे वर्षावास धम्म प्रवचन मालिकेचे बारावे पुष्प उत्साहात संपन्न
बोरघर/ पंचशील बौद्धजन सेवासंघ , बौद्धजन पंचायत समिती गोरेगाव विभाग शाखा क्र ८४१ आणि पंचशील महिला सेवासंघ गोरेगाव विभाग यांनी शनिवार दिनांक २७/९/२०२५ रोजी आयोजित केलेल्या वर्षावास प्रवचन कार्यक्रम मालिकेचे बारावे पुष्प संबोधी बुद्धविहार गोरेगांव या ठिकाणी तुकाराम लोखंडे साहेब यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाले. या वेळी प्रमुख वक्ते पन्हळघर सुपुत्र महावितरण अधिकारी अशोक जाधव यांनी अधर्म आणि सधम्म या विषयावर आपले अभ्यासपुर्ण विचार मांडताना विज्ञानावर आधारीत बौद्ध धम्म नसुन धर्मावर आधारित आजचे विज्ञान आहे असे सविस्तर उदाहरणसह विवेचन करून मनावरील नियंत्रण हेच माणसाच्या वर्तणुकीचे मुळ आहे. मनाची अभिलाषा आणि त्याग यावर मार्गदर्शन करताना धम्म आचरण हि काळाची गरज असून तरूण पिढीने धम्म आणि सधम्म जाणून घेतला पाहिजे. अष्टांग,आर्यसत्य यांचे पालन केले पाहिजे. त्यानंतर बौदउपासक नागाव सुपुत्र आयु. संतोष हाटे यांनी स्वतःच्या घरात कुटुंबा पासून धम्म कसा रुजवला त्याची माहिती सांगता आज त्यांचा चिरंजीव वयाच्या बावीस व्या वर्षी श्रामणेर झाला आहे.
या प्रसंगी पंचशील महिला संघाच्या अध्यक्षा सुप्रियाताई साळवी, सचिव संघमित्रा गायकवाड, रेश्मा साळवी , राखी मोरे, प्रणाली जाधव, पंचशील बौद्धजन सेवासंघाचे सचिव संदिप साळवी सर, शरद मोरे, बळीराम हाटे, हिरामण महाडिक ,सुरेश जाधव, श्रीकांत साळवी, सुरेश अहिरे देवळी,सम्यक साळवी उपस्थित होते. राजू मोरे सर यांनी २२ प्रतिज्ञा देऊन मला मिळालेला उत्कृष्ट शिक्षक सन्मान हा कुशल कर्माच फळ आहे नियमित वर्षावास प्रवचन कार्यक्रमाच्या मालिकेतून धम्म समजून घेताना आपले काम कुशल आणि प्रामाणिक कसे होईल हे शिकायला मिळाल अस मत व्यक्त केले.