स्मशानभुमी समस्या निवारणासाठी ग्रामपंचायतींनी
सहकार्य करावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
छत्रपती संभाजीनगर,- जिल्ह्यात स्मशानभुमी समस्या निवारणासाठी मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत स्थानिक ग्रामपंचायत, सरपंच आदींनी प्रशासनाला सहकार्य करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून स्मशानभुमी समस्या निवारण अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा सध्या चवथा टप्पा सुरु असून त्यात स्मशानभुमीच्या समस्यांची गावनिहाय माहिती संकलित केली जात आहे. आपल्या गावातील स्मशानभुमी असल्यास समस्यांची यादी, नसल्यास स्मशानभुमीच्या जागेबाबतचा प्रस्ताव, सुविधा नसल्यास त्याबाबत माहिती तहसिल कार्यालयात कळवावी,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे.
