राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात ‘दैनिक समर्थ राजयोग’ चे जिल्हा प्रतिनिधी फारुक शेख यांना आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर उत्कृष्ट जिल्हा प्रतिनिधी पुरस्कार २०२५’ ने सन्मान
जालना/प्रतिनिधी/ शिक्षक दिन आणि दैनिक समर्थ राजयोग या लोकप्रिय दैनिकाच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा २०२५ शुक्रवार, दि.५ सप्टेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,नगर रोड, बीड येथे अत्यंत भव्य, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.या प्रेरणादायी सोहळ्यात विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्यात आले. विशेषतः पत्रकारितेच्या क्षेत्रात समर्पित कार्य करणाऱ्या दैनिक समर्थ राजयोग चे जालना जिल्हा प्रतिनिधी श्री. फारुक शेख यांना ‘आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर उत्कृष्ट जिल्हा प्रतिनिधी पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला.फारुक शेख यांचा गौरव जिल्ह्याचा अभिमान मा.श्री.जतीन रहमान (मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद,बीड) यांच्या शुभहस्ते फारुक शेख यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
फारुक शेख हे जालना जिल्ह्यातील एक निर्भीड,सजग आणि समाजाभिमुख पत्रकार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू केवळ बातम्या देणे नव्हे,तर समाजघटनात सक्रिय सहभाग घेणे,हे आहे.त्यांनी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना विशेष मान्यता मिळाली.तसेच,अंबड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी आवाज उठवला,आंदोलने केली आणि लोकप्रतिनिधींना जनतेच्या समस्या पोहोचवण्यासाठी माध्यम बनले.पत्रकार हा केवळ लेखक नाही, तो लोकांच्या भावना मांडणारा लोकप्रतिनिधी असतो, असे श्री. फारुक शेख यांनी पुरस्कार स्वीकारताना सांगितले. पत्रकार संघटनांच्या बांधणीसाठी योगदान
फारुक शेख हे केवळ बातम्यांच्या मागे धावणारे पत्रकार नाहीत,तर पत्रकार संघटनांच्या बांधणीसाठी, हक्कासाठी आणि सन्मानासाठी झटणारे कार्यकर्ते आहेत. पत्रकारांच्या सुखदुःखात सहभागी होणारे,अन्यायाविरुद्ध न डगमगता उभे राहणारे, समाज,राजकारण,क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये सक्रिय असणारे असे त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे.या सर्व योगदानाच्या पार्श्वभूमीवर ‘आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार’ त्यांना प्राप्त झाला, ही संपूर्ण जिल्ह्याच्या पत्रकारितेची प्रतिष्ठा वाढवणारी बाब ठरली आहे.जिल्ह्यातून सर्वच स्तरातून त्यांचे उत्स्फूर्त अभिनंदन करण्यात येत आहे.
कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती एक विराट सोहळा
या भव्य कार्यक्रमास महाराष्ट्रभरातून आलेले शिक्षणतज्ज्ञ,सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार,साहित्यिक आणि प्रशासनातील मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये हे दिग्गज होते.