समाजसेवेतील सक्षम नेतृत्व राजु पाटील शिंपाळकरांनी काँग्रेस पक्षाकडुन सगरोळी जि. प. गटातुन निवडणूक लढवावी
देगलूर/प्रतिनिधी/ शेतकरी शेतमजुर निराधार गोरगरीब जनतेच्या प्रश्नानाच्या न्यायासाठी सातत्याने आवाज उठवणार समाजसेवेतील आमच्या हक्काच सक्षम नेतृत्व राजु पाटील शिंपाळकरांनी सगरोळी सर्वसाधारण महीलेसाठी राखीव जि. प. गटातुन प्रतिनिधी स्वरुपात निवडणूक लढवावी आशी आग्रहाची भुमिका या गटातील त्यांच्या चहात्या मतदार वर्गातुन होत आहे.
गेल्या आनेक वर्षा पासुन पञकारीतेच्या माध्यमातुन सामाजिक कार्याचा वसा घेऊन सर्व समाज घटकातील वंचितांच्या न्यायासाठी चारित्र्य संपन्न अंगीकृत साकारलेल सर्व गुण सपन्न या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून शेतकरी,शेतमजुर, निराधार, अपंग आशा विविध घटकातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषया बरोबर वंचिताच्या प्रश्नावर न्यायासाठी सतत धडपडणा-या या कणखर नेतृत्वाने तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात सामाजिक कार्याची चांगलीच छब्बी निर्माण केली आसुन त्यानी आपल्या चळवळीच्या माध्यमातून सन २०१६ मध्ये बिलोली तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी नुकसानीचे जवळपास १९ कोटीचे प्रशासन स्तरावर रखडलेले अनुदान आसेल डिसेंबर २०२१ मध्ये रब्बी हंगामात झालेल्या गारपिठीच्या नुकसानीचे प्रलंबित अनुदान आसेल यासाठी तहसिल कार्यालया समोर सतत दोन ते तिन वेळा केलेल्या उपोषणाच्या माध्यमातून शासन व प्रशासन स्थरावर रखडलेल्या अनुदानीत रक्कमेच्या मागणीचा सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे त्या अन्अपेक्षित अनुदानाची रक्कम शेतक-यांच्या बँक खात्यात जमा करण्यास भाग पाडून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला.तसेच तेलंगणा राज्याच्या धर्तीवर सगरोळी जि. प.गटासह सिमा भागाचा विकास झाला पाहीजे ही संकल्पना नजरे समोर ठेऊन सहकारी मित्राच्या माध्यमातून चळवळ उभी करून शासन व प्रशासन दरबारी अनेक मुद्यावर विकासाच्या चळवळीतील मागण्यांचे काही प्रमाणात यशस्वी प्रयत्न सफल केले.याबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे नैसर्गिक संकटातील पिक नुकसानी आसेल या शेतकरी आत्महत्या आसतील व संजय गांधी योजनेतील लाभार्थ्याचा प्रश्न आसेल किंवा कुठल्याही स्थरावर्ती निर्माण झालेले गटा – तटातील आणी कौटुंबिक, आशा विविध प्रकारचे जे वाद – विवाद आसतील ते समोपचाराने मिटवणे याबरोबर वेगवेगळ्या समाज घटकातील वंचिताना न्याय मिळवून देणे हे त्यांच्या समाजसेवेतुन अंगी साकारलेले गुण सर्वश्रुत आहेत. तसेच शासकीय व निमशासकिय कार्यालयातील जनतेच्या आडी-आडचणीच्या वेळी धाव घेऊन मदत करणे हा त्याचा नित्यांचाच विषय आहे. जनसेवेच्या भुमिकेतुन निर्माण केलेला हा त्यांचा माणुसकीचा जिव्हाळा आज प्रत्येकाला हवाहवासा वाटणार आस हे निष्कलंकीत नेतृत्व आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेचे निवडणुकीत सगरोळी सर्वसाधारण महीलासाठी सुटलेल्या या गटातील मौ. शिंपाळा गावच्या या भुमिपुञाने वेळोवेळी काँग्रेस पक्षाच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहुन मागिल अनेक निवडणुकीत या गटातील उमेदवारांची जबाबदारीने धुरा सांभाळून गळ्यात विजयाची माळ टाकण्याचा त्यांचा प्रामाणिक पणे प्रयत्न झाला.या भागातील जिवाभावाचा आसलेला दांडगा जनसंपर्क,राजकिय, सामाजिक,विकासाची जाण आसणा-या आशा या बहुगुणी समाजसेवेतील सक्षम नेतृत्व जेष्ठ पञकार राजु पाटील शिंपाळकरांनी सगरोळी जि. प. गटातुन प्रतिनिधी स्वरुपातुन काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवावी आशी मागणी चाहात्या मतदार वर्गातुन वाढत्या पाठिंब्याचा श्रोत पुढे येत आहे.