कन्नड / प्रतिनिधी/ कन्नड तालुक्यातील साखरवेल ते करंजखेड प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ११ या रस्त्याची चाळणी झालेली असून मोठमोठी खड्डे या रस्त्यावर पडलेली आहे. या रस्त्यावरून असंख्य वाहनांची येजा असते. दळणवळणाचे साधन म्हणून हा मुख्य रस्ता मानला जातो. करंजखेड व चिंचोली (लिं) या दोन सर्कलमधील लोकांचा हा रस्ता उपजीविकेचा मानला जातो. या रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन ने आण केली जाते. किती वर्षापासून या रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही. अनेक वाहनधारकांना पाठीचे व मणक्याचे आजार जडले असून.या रस्त्यावर नेहमी छोटे-मोठे अपघात घडत असतात. वारंवार मागणी करूनही निवेदने देऊनही या रस्त्याकडे कोणीही प्रशासन व अधिकारी बघायला तयार नाही.या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करून रस्ता चांगल्या प्रकारे तयार करण्यासाठी चिंचोली लिंबाजी येथील सामाजिक कार्यकर्ते तातेराव भुजंग व घाटशेंद्रा येथील सामाजिक कार्यकर्ते कृष्णा सहाने यांनी उपोषणाच्या हत्यार हाती घेतले आहे.ते (दि.२५) पासून करंजखेड फाटा येथे उपोषणास बसले आहेत. त्यांच्या उपोषणास आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष प्रकाश गाडेकर, नागापूर चे उपसरपंच जलील पठाण,राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे तालुकाध्यक्ष नवाब शेख,कलीम पेंटर, राहुल चौतमल,अनिल माळी, मंगेश तायडे, वजीरखा पठाण, अनिल सपकाळ आदिंनी भेट देत पाठिंबा दिला आहे. या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.छायाचिञ सुनिल निकम