Sunday, October 26, 2025
Homeपुणेकोल्हापूरसागरभाऊ खोत यांच्या वाढदिवसानिमित्त  रयत क्रांती कामगार संघटनेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन...

सागरभाऊ खोत यांच्या वाढदिवसानिमित्त  रयत क्रांती कामगार संघटनेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन – प्रदेशाध्यक्ष जितेंद्र सुर्यवंशी 

सागरभाऊ खोत यांच्या वाढदिवसानिमित्त  रयत क्रांती कामगार संघटनेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन – प्रदेशाध्यक्ष जितेंद्र सुर्यवंशी 
इस्लामपूर(प्रतिनिधी) इकबाल पीरजादे/महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री, आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर कार्यरत असलेल्या रयत क्रांती कामगार संघटनेच्या वतीने, रयत क्रांती संघटनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, युवक नेते सागरभाऊ खोत यांचा वाढदिवस शनिवार दिनांक ५ एप्रिल रोजी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार असल्याची माहिती कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र सुर्यवंशी यांनी दिली. शनिवारी सकाळी १० वाजता इस्लामपूर यल्लामा चौक येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नोंदित बांधकाम कामगार यांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन. मंजूर बांधकाम कामगार यांना पेटी व भांडी, संसार संच साहित्यांचे वाटत करण्यात येणार आहे. तसेच आरोग्य कार्ड , स्मार्ट कार्ड व आबा कार्डचे वाटप करण्यात येणार आहे. तरी नोंदित कामगार यांनी आधार कार्ड, रेशनकार्ड व फोटो घेवून उपस्थित रहावे. तसेच दूपारी ३ वाजता एस.के. इंटरनॅशनल स्कूल रेठरेधरण येथे ज्या कामगार यांना घरकुले मंजूर झाली आहेत त्यांना मंजूरीचे पत्र वाटप व युवक नेते  सागरभाऊ  खोत यांचा वाढदिवसा निमित्त यथोचित सन्मान व सत्कार करण्यात येणार आहे. याशिवाय जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. याशिवाय अन्य निरनिराळे उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती रयत क्रांती कामगार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. जितेंद्र सुर्यवंशी यांनी दिली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments