Tuesday, March 31, 2026
Homeऔरंगाबादसफाई कर्मचारी पदासाठी अर्ज करावेत

सफाई कर्मचारी पदासाठी अर्ज करावेत

सफाई कर्मचारी पदासाठी अर्ज करावेत

जालना : जालना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या बहुउद्देशीय महासैनिक लॉन येथे अशासकीय स्तरावर सफाई कर्मचाऱ्यांचे एक पद एकत्रित मानधन तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात भरण्यात येणार आहे.  अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये माजी सैनिकाच्या पत्नीस प्राधान्य दिले जाईल. नंतरच इतर नागरिकांचा विचार करण्याचे व निवड करण्याचे अधिकार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्याकडे राहतील. तरी अशासकीय सफाई कर्मचारी पदासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी दि.18 डिसेंबर 2025 पर्यंत कागदपत्रासह आपले अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जालना येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments