साडेचार लाखांची वीजचोरी; 47 जणांवर गुन्हे दाखल
गंगापूर तालुक्यात महावितरणची धडक कारवाई
छत्रपती संभाजीनगर : गंगापूर तालुक्यातील विविध गावांत महावितरणने राबवलेल्या धडक मोहिमेत 47 जण वीजचोरी करताना आढळले. मात्र वीजचोरीची बिले भरण्यास टाळाटाळ केल्याने आरोपींवर चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. महावितरणच्या या धडाकेबाज कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहे.
माळीवाडा येथील महावितरणचे तत्कालिन सहायक अभियंता मोहंमद अब्दुल हकीम व वरिष्ठ तंत्रज्ञ नितीश पाल्हाळ यांनी 3 जुलै 2024, 3 व 4 मार्च 2025 आणि 12 जून 25 रोजी गंगापूर तालुक्यातील जांभाळा, टाकळी कदिम, टाकळीवाडी आणि वरझडी येथे तपासणी मोहीम राबवली. यात काही नागरिक विद्युत वाहिनीवर सर्व्हिस वायरच्या साह्याने आकडा टाकून चोरून वीज वापरत असल्याचे आढळले. यात जांभाळा येथील शेख शफिक शेख रशीद, फेरोजुद्दिन पठाण, पंचशीला रावसाहेब दाने, मानिनुद्दिन शेख नुरुद्दिन, सुनील भीमराव चंदेल, दैविदास भाऊलाल पवार, नुरुद्दिन जमालुद्दिन, दीपक कडूबा मंजुळ, मिन्हाज खान हमीद खान, टाकळी कदिम येथील संतोष भीमराव थोरात, राजेंद्र बन्सी थोरात, टाकळीवाडीतील तुलसाबाई हरसिंग जारवाल, वरझडीतील केशरसिंग सांडूसिंग जोनवाल, मोतीलाल सांडू ठाकूर, लताबाई शिवसिंग डेडवाल, झनकसिंग शामसिंग पल्हाटे, रूपसिंग सांडू जोनवाल व रामधन आसाराम नागलोत या सर्वांनी मिळून 1 लाख्र 61 हजार 502 रुपयांची 7 हजार 633 युनिट वीजचोरी केली.
2 व 11 सप्टेंबर 2024, 1 जानेवारी व 12 जून 2025 रोजी माळीवाडा येथील सुनीता अर्जुन आस्वार, पावलास गुलाबराव दाभाडे, सतीश भगवंतराव तळेकर, राजू सुभाष शिंदे, अय्युब अली उस्मान अली, गणेश लक्ष्मण खंडागळे, सुनीता रामदास साठे, दामू रतन साठे, अनिल सोमीनाथ साठे, सिद्धार्थ नामदेव साठे, सुनील उत्तम साठे, फतियाबाद येथील भानुदास भाऊसाहेब शेळके, पेकलवाडी येथील यज्ञवीर आनंदराव कावडे, राजाराम मैपती कांडेकर, इस्माइलपूर येथील प्रेमसिंग तानसिंग सुंदरडे, संजय स्वरुपसिंग गुसिंगे हे वीजचोरी करताना आढळले. या सर्वांनी मिळून 1 लाख 75 हजार 399 रुपयांची 8 हजार 880 युनिट वीजचोरी केली.
3 व 19 सप्टेंबर 2024, 2 व 3 एप्रिल 2025 रोजी आसेगाव येथील मकसूद खान मकबूल खान पठाण, अभिषेक देविदास थोरात, गणेश गंगाधर जाधव, एकनाथ रामकिसन पाल्हाळ, भोलेनाथ रतन आव्हाड, योगेश शंकर पाल्हाळ, अंबेगाव येथील ज्ञानेश्वर कचरू मोरे, नामदेव भानुदास पवार, सुखदेव रामचंद्र सोनवणे, बाबुराव भागाजी थोरात, खोजेवाडी येथील बद्रीनाथ किसन परहाड, धोंडिबा साहेबराव पवार, आदेश सुरेश तुपे हे वीजचोरी करताना आढळले. या सर्वांनी 1 लाख 8 हजार 296 रुपयांची 4 हजार 983 युनिट वीजचोरी केली.
