टेंभरी एमआयडीसी बुटीबोरी येथे सुरक्षा रक्षकांची सभा संपन्न
नागपूर/प्रतिनिधी/ आज दिनांक 23.7.2025 रोजी दुपारी 1 वाजता टेंभरी एमआयडीसी बुटीबोरी,नागपूर येथे स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्याचे सहसचिव मा.गणेश उके यांचे अध्यक्षतेखाली व स्वतंत्र सुरक्षा रक्षक संघ विदर्भाचे संयोजक मा. सुरेश गोसावी स्वतंत्र मजदूर युनियन नागपूर शाखेचे अध्यक्ष मा.सुरेश पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. सभेत मा आनंद तेलतुंबडे, विकास बोरकर,हिरेन्द्र मेश्राम व जयेंद्र राऊत यांनी सुरक्षा रक्षकांच्या समस्या सांगितल्या यात किमान वेतन, ईपीएफ,इ एसआयसी, महागाई, घरभाडे, वाहन, धुलाई व शैक्षणिक भत्ता दिल्या जात नाही, वेतन चिट्टी देत नाही, 12 तास काम, साप्ताहिक सुट्टी,भरपगारी रजा,सानुग्रह अनुदान, बोनस दिल्या जात नाही असे सांगितले.मा.गणेश उके यांनी स्वतंत्र सुरक्षा रक्षक संघाचे ध्येय, उद्देश व कार्याची माहिती देऊन नागपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाकडे 104 कारखाने व आस्थापनाची नोंदणी असून 2602 सुरक्षा रक्षक नोंदीत आहेत, महाराष्ट्रात मंडळाकडे 1650 कारखाने व आस्थापनाचे नोंदीत मुख्य मालक कार्यरत आहेत व 36,060 नोंदीत सुरक्षा रक्षक कार्यरत असून त्यांच्या सेवा वरील मंडळात नोंदीत असलेल्या मुख्य मालकांच्या आस्थापना व कारखानांना देण्यात येत आहे राज्यात 37100 कारखाने व 2683893 आस्थापना असूनही 14 सुरक्षा रक्षक मंडळात फक्त 1650 इतके नोंदीत मालक कार्यरत असून 36060 एवढे नोंदीत सुरक्षा रक्षक कार्यरत असल्याचे सांगून 7 सामाजिक सुरक्षा योजना राबविल्या जाते म्हणून शासनाचे आदेश आहेत परंतु कारखाने व आस्थापनाची मंडळाकडे नोंदणी नसल्याने कारखाने व आस्थापना सुरक्षा रक्षकांना त्यांचे हक्क व अधिकार तसेच सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ मिळत नाही त्यामुळे सुरक्षा रक्षकाने संघटित होऊन स्वतंत्र सुरक्षा रक्षक संघात सामील होऊन संघर्ष करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी मा.सुरेश गोसावी, मा.यांनी सभेला संबोधित केले.सभेचे संचालन मा.युवराज खोब्रागडे तर आभार आनंद तेलतुंबळे यांनी मानले.