रोजगार मेळाव्याचे आयोजन
जालना :- जालना जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींसाठी रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि हुतात्मा जनार्दनमामा नागापूरकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. 27 मार्च 2026 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. तरी जालना जिल्ह्यातील जास्तीत जास्त नोकरी इच्छुक महिला व पुरुष उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्र, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
