राहुलनगर कातपूर येथील युवक तीन दिवसापासून बेपत्ता
पिपंळवाडी/ प्रतिनिधि /पैठण तालुक्यातील राहूलनगर कातपूर येथील विकास सुभाष निकाळजे वय ३५ वर्ष युवक हा दि.२५/३/२०२५ मंगळवार,सकाळी साधारण सात वाजेच्या सुमारास कोणालाही काहीही न सांगता राहत्या घरातुन बाहेर पडला आहे.त्याचा वर्ण सावळा असून त्याच्या अंगावर निळ्या रंगाचा चेक्सचा शर्ट व त्याने नाइट पँट घातलेली आहे.तिन ते चार दिवस झाले आहे तो अद्यापही घरी आलेला नाही. तेंव्हा कोणालाही या विषयी काही माहिती असल्यास व तो कोठे आढळल्यास तात्काळ पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यासी संपर्क करावा असे आवाहन करण्यात येत आहे.