Tuesday, October 28, 2025
Homeऔरंगाबादरोहित शर्मा ऑस्ट्रेलियातून परतला, चाहत्याचा 2027 च्या वर्ल्डकपचा प्रश्न, हिटमॅननं काय...

रोहित शर्मा ऑस्ट्रेलियातून परतला, चाहत्याचा 2027 च्या वर्ल्डकपचा प्रश्न, हिटमॅननं काय उत्तर दिलं?

रोहित शर्मा ऑस्ट्रेलियातून परतला, चाहत्याचा  2027 च्या वर्ल्डकपचा प्रश्न, हिटमॅननं काय उत्तर दिलं?

 मुंबई:ऑस्ट्रेलियातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका संपल्यानंतर रोहित शर्मा भारतात दाखल झाला आहे. रोहित शर्मानं अखेरच्या दोन एकदिवसीय सामन्यात धमाकेदार फलंदाजी केली. भारतानं जरी मालिका गमावली असली तरी रोहित शर्माला ‘प्लेअर ऑफ द सीरीज’ पुरस्कार देण्यात आला. रोहित शर्मा मुंबई विमानतळावर दाखल झाल्यानंतर चाहत्यांनी जोरदार स्वागत केलं. रोहित शर्मानं चाहत्यांसोबत सेल्फी काढली.रोहित शर्माच्या चाहत्यानं त्याला एक प्रश्न विचारला. तो प्रश्न रोहित शर्माच्या प्रत्येक चाहत्याच्या मनातील होता. रोहित शर्मा 2027 चा वर्ल्ड कप खेळणार की नाही असा प्रश्न चाहत्यानं विचारला होता.

2027 चा वनडे वर्ल्ड कप रोहित शर्मा खेळणार?

रोहित शर्मानं कसोटी आणि टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. सध्या रोहित शर्मा वनडे क्रिकेटमध्ये भारताचा सलामीवीर आहे. ऑस्ट्रेलियातील मालिकेत रोहित शर्मानं एका मॅचमध्ये अर्धशतक तर दुसऱ्या मॅचमध्ये नाबाद शतक झळकावलं. रोहित शर्मा ऑस्ट्रेलियातून मुंबईत दाखल झाल्यानंतर चाहत्यांनी मुंबईचा राजा अशा घोषणा दिल्या. यानंतर रोहित शर्मानं चाहत्यांसोबत सेल्फी काढली. एका चाहत्यानं रोहित शर्माचा फोटो असलेले टी-शर्ट घातला होता. रोहित शर्मानं त्या चाहत्याच्या टी-शर्टवर सही केली. रोहित शर्मानं सही करताच चाहत्यनं 2027 चा वर्ल्ड कप खेळणार का असा सवाल विचारला.यानंतर चाहत्यानं नक्की खेळा हे माझं स्वप्न आहे. रोहित शर्मानं चाहत्याचा मुद्दा ऐकला आणि स्माईल करत कारमध्ये जाऊन बसला.

रोहित शर्माची ऑस्ट्रेलियात दमदार कामगिरी

रोहित शर्मानं ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या वनडेत 8  धावा केल्या होत्या. त्यानंतर रोहित शर्मानं दमदार कमबॅक केलं. त्यानं दुसऱ्या मॅचमध्ये 97 बॉलमध्ये 73 धावा केल्या. मात्र, त्याला शतक करता आलं नव्हतं. तिसऱ्या वनडेत रोहित शर्मानं 125 बॉलमध्ये 121 धावा केल्या. विराट कोहलीच्या साथीनं भारताला तिसऱ्या वनडेत विजय मिळवून दिला.

रोहित शर्मा पुन्हा मैदानावर कधी दिसणार?

रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटध्ये सध्या केवळ एकदिवसीय सामने खेळत असल्यानं चाहत्यांना पुढील वनडे मालिकेची वाट पाहावी लागणार आहे. मात्र, चाहत्यांठी आनंदाची बाब म्हणजे एका महिन्यात रोहित शर्मा पुन्हा मैदानावर दिसेल. कारण, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिका 30 नोव्हेंबर पासून सुरु होईल. या मालिकेत तीन सामने खेळवण्यात येतील. 30 नोव्हेंबर, 3 डिसेंबर आणि 6 डिसेंबरला तीन सामने होणार आहेत. रोहित च्या चाहत्यांसाठी ही पर्वणी असेल.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments