आद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे यांचा इतिहास युवा पिढीने अंगीकारणे ही काळाची गरज-गुणवंत एच.मिसलवाड
नांदेड – आपल्या या भारत देशाच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घडामोडी झाल्या. काहींची इतिहासात नोंद झाली तर काही क्रांती विरांची दखलच घेतली गेली नाही.1857 च्या उठावा अगोदर 18 व्या शतकात आदिवासी कोळी महादेव जमातीत जन्मलेले सुपूत्र आद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे यांनी भारत देश स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी व जुलमी सावकारी विरोधात बंड पुकारून लढा दिला. अशा या महान आद्य क्रांतीकारकाचा इतिहास युवा पिढीने अंगीकारून समाजाप्रती-देशाप्रती कार्य करण्याची ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते मा.श्री.गुणवंत एच.मिसलवाड यांनी केले. ते दि.8 नोव्हेंबर 2025 शनिवार रोजी बिरसा मुंडा चौक काबरा नगर नांदेड येथे सायंकाळी ठिक 5 वाजता सकल आदिवासी कोळी महादेव व मन्नेरवारलू जमातीच्यावतीने संयुक्तीकरित्या सह्याद्रीचा ढाण्या वाघ, ब्रिटीशांचा ज्वलंत कर्दनकाळ, देश स्वातंत्र्य लढ्यातील आद्य क्रांतीकारक राघोजी रामजी भांगरे यांची 220 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या जयंती अभिवादन कार्यक्रम सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. सर्व प्रथम समाजाचे ज्येष्ठनेते मा.श्री. उत्तम गुंडावार यांच्या हस्ते आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पुढे बोलताना ते आपल्या भाषणात म्हणाले की, राघोजी भांगरे यांनी जंगल उठावासाठी, शेतकऱ्यांसाठी, सकल आदिवासी जमातीसाठी, देश स्वातंत्र्यासाठी अतुलनीय शौर्य गाजवून शहिद झाले. अशा या महान आद्य क्रांतीवीराचा इतिहास महाराष्ट्र शासनाने शालेय पाठ्यक्रमामध्ये समाविष्ठ करावा, जेणे करून युवा पिढींना आदर्श मिळेल, अशीही मागणी आपल्या भाषणात मा.श्री.गुणवंत एच.मिसलवाड यांनी राज्य शासनाकडे केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.ज्ञानेश्वर मरकंटे यांनी केले तर सुत्रसंचालन दादाराव कोठेवाड यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शन मुख्याध्यापक माधव रेडेवाड यांनी मानले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून लेखाकार रावसाहेब पल्लेवाड, लक्ष्मण दोंतूलवाड,राजू पालेपवाड, विठ्ठलराव पंजेवाड, प्रा.ज्ञानेश्वर मरकंटे, दत्तात्रय अन्नमवाड, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच.मिसलवाड, भाऊराव चिंचलवाड, ज्ञानेश्वर हाराळे, मुख्याध्यापक माधव रेडेवाड,बापूराव पारवे, दादाराव कोठेवाड, शिवाजीराव ताटे, महिपती डोंबूलवाड, सुर्यकांत खानापूरकर, गणपतराव नागदरवाड, प्रभू इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास नांदेड शहरातील तमाम सकल आदिवासी जमातीचे बंधू-भगीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
