Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादप्रजासत्ताक दिनी आरोग्य कर्मचाऱ्याचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा

प्रजासत्ताक दिनी आरोग्य कर्मचाऱ्याचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा

प्रजासत्ताक दिनी आरोग्य कर्मचाऱ्याचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा

शासन आदेशान्वये कायम सेवेची संधी हेतुपूरस्सर डावलल्याचा आरोप,वर्षभरापासून न्यायाची प्रतीक्षा
जालना/प्रतिनिधी/ शासन आदेशान्वये कायम सेवेची संधी मिळणे अपेक्षित असलेल्या जिल्ह्यातील 10 कंत्राटी कर्मचाऱ्यांची नौकरी संबधितांनी कटकारस्थान रचून डावलल्याचा गंभीर आरोप करत सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषीवर कारवाई करत आपणास न्याय देण्यात यावा या मागणीसाठी प्रशासकीय कारभारास वैतागलेले आरोग्य कर्मचारी इरफान बद्रोहीन शेख यांनी प्रजासत्ताक दिनी (ता.26) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा ईशारा दिला आहे.
याबाबत मा.जिल्हाधिकारी यांना दिलेल्या अर्जात इरफान बद्रोहीन शेख (रा.शेवगा,ता.अंबड) यांनी जिल्हा शल्यचिकित्सक,जालना यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले असून शासन आदेशानुसार आपल्याला कायम सेवेत समावेश होण्याची संधी असतांनाही ती संधी जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचे त्यांनी आपल्या अर्जात नमूद केले आहे. या प्रकारामुळे संबंधित जिल्ह्यातील 10 कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला असून त्यांना न्याय मिळावा,यासाठी त्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबल्याचे स्पष्ट केले आहे.इरफान शेख यांनी यापूर्वी 12 डिसेंबर 2025 रोजी आपल्या तक्रार अर्जाची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयात केली होती.त्या अर्जात त्यांनी नमूद केले की,जिल्हा शल्यचिकित्सक जालना यांनी कटकारस्थान करून शासनाने आपल्याला दिलेली कायम सेवेची संधी डावलली आहे.शासन निर्णय,नियम व अटींचे उल्लंघन करून काही विशिष्ट व्यक्तींना लाभ देण्यात आल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. या संदर्भात शेख यांनी आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई येथील मा.आयुक्त आरोग्य सेवा यांच्याकडेही लेखी तक्रार दाखल केली आहे.या तक्रारीत संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी अहवालाची प्रत अर्जदारास पाठवावी,अशी स्पष्ट मागणी करण्यात आली होती.मात्र मोठा कालावधी लोटूनही या प्रकरणी कोणताही प्रतिसाद किंवा लेखी उत्तर मिळाले नसल्याने अर्जदारांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सदर प्रकरण अत्यंत गंभीर असूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे दिसून येते.त्यामुळे संबंधित कर्मचारी न्यायापासून वंचित राहात आहे.शासन स्तरावर तक्रार दाखल करूनही दखल घेतली जात नसेल, तर सामान्य नागरिकाने न्याय कुठे मागायचा,असा सवाल शेख यांनी उपस्थित केला आहे.
 या प्रकरणामुळे प्रभावित झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भवितव्याचा प्रश्नही ऐरणीवर आला असून अनेक वर्षे सेवा बजावल्यानंतर शासन आदेशानुसार कायम सेवेत सामावून घेण्याची अपेक्षा असताना,कथित कट कारस्थानामुळे त्यांची संधी हिरावून घेतली गेल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments