Sunday, October 26, 2025
Homeऔरंगाबादपावसाच्या रेड अर्लटच्या पार्श्वभुमीवर माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर यांच्याकडून जालना शहरवासियांना सतर्कतेचे...

पावसाच्या रेड अर्लटच्या पार्श्वभुमीवर माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर यांच्याकडून जालना शहरवासियांना सतर्कतेचे आवाहन -दोन ऑटोरिक्षावर भोंगे लावून नागरिकांना केले आवाहन

पावसाच्या रेड अर्लटच्या पार्श्वभुमीवर
माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर यांच्याकडून
जालना शहरवासियांना सतर्कतेचे आवाहन
-दोन ऑटोरिक्षावर भोंगे लावून नागरिकांना केले आवाहन

जालना/प्रतिनिधी/  मागील काही दिवसांपासून जिल्हाभर प्रचंड
मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होवून जिल्ह्यासह जालना शहरातील नागरिकांचे
जनजीवन अत्यंत विस्कळीत झाले आहे. अशी परिस्थिती असतांना आज २७ सप्टेंबर
रोजी पुन्हा हवामान खाते व प्रशासनाच्या वतीने पुढील दोन दिवसांसाठी
अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला. या पार्श्वभुमीवर शिवसेना (उध्दव
बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष भास्करराव
अंबेकर यांनी जनतेच्या काळजीपोटी नागरिकांना अतिवृष्टीपासून सतर्क
करण्यासाठी जालना शहरात दोन ऑटोरिक्षावर भोंगे लावून नागरिकांना
खबरदारीच्या सुचना दिल्या.
शिवसेना जिल्हाप्रमुख अंबेकर हे सातत्याने वेगवेगळ्या अडीअडचणीच्या
प्रसंगी नागरिकांना मदत करत असतात. दोन दिवसांपूर्वीच शहरातील अनेक बाधित
वस्त्यांमध्ये अन्नधान्यांच्या किट वाटप त्यापुर्वी पुरीभाजी वाटप,
अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप असे
उपक्रम राबवून नागरिकांना दिलासा देण्याचे काम करीत आहे. कोरोना काळातही
जिल्हाप्रमुख अंबेकर यांनी दोन ऑटो रिक्षांना भोंगे लावून शहरातील
नागरिकांना घाबरुन न जाता सुरक्षेतच्या संदर्भात काळजी घेण्याचे आवाहन
केले होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments