प्रजासत्ताक दिनी पंजाब खिल्लारे यांचा सन्मान
जालना :- जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागातील कनिष्ठ सहाय्यक पंजाब संपतराव खिल्लारे हे नियत वयोमानानुसार दि.३० जून २०२५ रोजी सेवानिवृत्ती झाले आहेत. त्यांनी आपल्या सेवाकाळात प्रमाणिकपणे व कर्तव्यदक्षतेने शासकीय सेवा बजावली तसेच जालना जिल्हा परिषदेत उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल त्यांचा सोमवार दि.26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिनी जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांच्या हस्ते सेवापुर्तीनिमित्त सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.