Monday, March 30, 2026
Homeऔरंगाबादडॉ. लक्ष्मीकांत शिंदे यांच्या 'रिपेलंट यंत्रा'ला भारतीय पेटंट

डॉ. लक्ष्मीकांत शिंदे यांच्या ‘रिपेलंट यंत्रा’ला भारतीय पेटंट

डॉ. लक्ष्मीकांत शिंदे यांच्या ‘रिपेलंट यंत्रा’ला भारतीय पेटंट

जालना :- येथील जेईएस महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. लक्ष्मीकांत शिंदे यांनी डासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी एक विशेष ‘ड्युअल-पर्पज’ यंत्र विकसित केले असून, याला भारत सरकारचे पेटंट प्राप्त झाले आहे.
हे यंत्र एकाच वेळी कापूर आणि रिपेलंट लिक्विड अशा दोन्ही गोष्टींसाठी वापरता येते. बाजारातील रासायनिक रिपेलंटमुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी डॉ. शिंदे यांनी हा नैसर्गिक पर्याय शोधला आहे. या यंत्रात स्थानिक वनस्पतींपासून तयार केलेला अर्क वापरून नैसर्गिक पद्धतीने डासांना पळवून लावता येते.
डॉ. शिंदे यांचा कीटकशास्त्रातील संशोधनाचा मोठा अनुभव असून त्यांचे ६२ आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. हे नवीन यंत्र ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांतील लोकांसाठी आरोग्यदायी आणि फायदेशीर ठरणार आहे.
डॉ. शिंदे यांच्या यशाबद्दल जालना एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पुरुषोत्तमजी बगडिया, सचिव श्रीनिवासजी भक्कड, उपाध्यक्ष फुलचंदजी भक्कड, प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री आणि सर्व प्राध्यापक यांनी अभिनंदन केले आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments