कन्नड न.परिषदेची निवडणूक होणार रंगतदार,कोण बाजी मारणार कन्नड करांची उत्सुकता शिगेला
कन्नड/ कन्नड परिषदेची निवडणूक अत्यंत रंगदार होणार असुन कोण बाजी मारणार याकडे कन्नड वासियांची उत्सुकता शिगेला लागली आहे. होणाऱ्या या निवडणुकीत कन्नड न.परिषद नगराध्यक्ष पद हे महिलासाठी राखीव झाले असुन यासाठी शहरातील प्रतिष्ठित तथा युवा उद्योजक मनोज पवार यांच्या सुविज्ञ धर्म पत्नी उद्योजीका सौ.उर्मिलाताई पवार,मा.नगराध्यक्ष व न.परिषदेचे अनुभवी गट नेते श्री.संतोष कोल्हे यांच्या सुविज्ञ धर्म पत्नी मा.नगराध्यक्षा सौ.स्वातीताई कोल्हे,मा.उपनगराध्यक्ष व नामांकित डॉ.सादाशिव पाटील यांच्या सुविज्ञ धर्मपत्नी सौ.संगीताताई पाटील तथा मा.नगरसेवक व सर्वांचे परिचित कवडे काका यांच्या सुविज्ञ धर्म पत्नी सौ.अनिताताई कवडे या चारही तुल्यबल महा महिलात हा तुल्यबल सामना होणार असुन यात कोण बाजी मारणार याकडे सर्व कन्नड वसीयांचे लक्ष लागले असुन कधी नव्हे इतकी रंगतदार लढत यावेळी कन्नडकर अनुभवणार आहेत.चारही महिलांचे वतीने आतापासूनच जोड जम्यास सुरवात केली असुन आपआपले प्रमाणे गटागटांच्या भेटीगाठी घेण्यास सुरवातही केली आहे.आता कुणाकुणास पक्षाकडून उमेदवारी मिळते व कोण त्यात बाजी मारतो व कोण स्वतंत्र लढतो यावर पुढचे वजा बाकीचे गणित अवलंबून असणार आहे.त्यात आता महाविकास आघाडी व महाआघाडी यांचे वरिष्ठ नेते युती करतात की, आपल्या पक्षाचे वतीने स्वतंत्र लढतात यावरही बरेच काही पुढची गणिते अवलंबून असणार आहे.