रामनगर येथे श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न
पैठण/प्रतिनिधी/ पैठण शहरातील रामनगर येथे श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान (राम पंचायतन) मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा गुरुवारी (ता. दहा) सकाळी पार पडला. यानिमित्त शहरातून सवाद्य, भजनी मंडळ यांच्या समवेत भव्य शोभायात्रारामनगर-यशवंतनगर-इंदिरानगर-अन्नपूर्णानगर-भवानीनगर-नाथ हायस्कुल-छत्रपती शिवाजी महाराज चौक-मेनरोड-कोर्ट रोड-यशवंतनगर-बालाजी विहार-रामनगर या मार्गे काढण्यात आली.
या सोहळ्यास यजमान प्रकाश पानगे,भीमराव गोरे, मनोहर नवले,शरद थोटे,शिवाजी चव्हाण, श्रीकांत हाके, सुनिल लखोटिया, बबनराव शिंदे आदींच्या शुभहस्ते पूजन करत प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला.याप्रसंगी आमदार विलास बापू भुमरे,माजी नगराध्यक्ष दत्ताभाऊ गोर्डे,रामशेठ लोळगे,अनिल घोडके, सुरज लोळगे, बाळासाहेब माने,बद्रीनारायण लखोटिया, चेतन कासलीवाल, शिरीष नेऊरगावकर, जयकिशन लखोटिया,किशोर तावरे,जितू परदेशी,बंडूभाऊ आंधळे,सतिश पल्लोड, कुणाल खताडे मित्र परिवार, विजय मुळे, सतिश उदावंत, बंटी धुपे मित्र परिवार ,आकाश आमलेकर आदी चे सहकार्य व उपस्थिती लाभली .
कार्यक्रम यशस्वीतेसाठी – रामनगर, यशवंतनगर, इंदिरानगर,नाथविहार सह पैठण परिसरातील समस्त रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित व योगदान मोलाचे ठरले .

