रमेश आडसकर यांनी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या पिकांची केली पहाणी
संबंधित अधिकारी यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क;
नुकसानग्रस्त शेतकर्यांना भरपाई मिळवून देण्याचे दिले आश्वासन;
केज- बीड जिल्ह्याचे जेष्ठ नेते, रमेश आडसकर यांनी केज तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या पिकांची पहाणी करून संबंधित अधिकारी यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधून जलद गतीने शेतीचे पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर कराव्या अशी मागणी केली आहे.
मागील काही दिवसांपासून केज तालुक्यात संततधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतात तळ्यांचे स्वरूप आले आहे. पिकांचे नुकसान झाले आहे.
शेतकरी हतबल झाले आहेत.
रा. कॉ. पक्षाचे ज्येष्ठ नेते रमेशराव आडसकर यांनी केज तालुक्यातील बोरगाव, भोपला, राजेगाव, दहीटना सह अनेक गावात दौरा करत पायी शेतकर्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष माहिती घेऊन संबंधित अधिकारी यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधून शासनाकडे अहवाल लवकर पाटवा अशी विनंती करून आपण स्वतः उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याशी भेटून जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे असे यावेळी सांगितले आहे.